प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
शिक्षण हक्क कायदा (आर,टी.ई) मध्ये ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला प्राथमिक शिक्षण एक किलोमीटर अंतराच्या आत मध्ये मिळण्याचा हक्क कायद्याने दिलेला आहे.
परंतू वीस पेक्षा कमी विद्यार्थी संख्येचे कारण दाखवून जिल्हा परिषद अंतर्गत चालण्याऱ्या प्राथमिक शाळा बंद करून गोर गरिबांच्या मुलांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचा दुर्दैवी व घातक निर्णय शासनाने घेतलेला आहे.
सदरील निर्णय तत्काळ रद्द करून महाराष्ट्रातील सर्व शाळा पूर्ववत चालू ठेवाव्यात आन्यथा राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी,जिल्हा बीड च्या वतीने पंन्नास खोके..तुमचे सब कुछ ओके.. म्हणत तीव्र आंदोलन छेडण्याच येईल असे प्रसिध्दी पत्रक प्रा.ईश्वर मुंडे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी कॅांग्रेस पार्टी ओबीसी सेल यांनी प्रसिध्द केले आहे.


