shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नवमतदार नोंदणी अभियानाच्या महाराष्ट्र प्रदेश संयोजक पदी किरण बोराडे यांची नियुक्ती..!


शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन) :-
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या सूचनेनुसार भारतीय जनता युवा मोर्चावर बुथरचनेनुसार नवमतदार नोंदणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, 

त्याअनुषंगाने युवा मोर्चाच्या वतीने नुकतीच वसंत स्मृती दादर येथे भाजपा प्रदेश महामंत्री व युवा मोर्चाचे प्रभारी विक्रांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या प्रदेश बैठकीत किरण बोराडे यांच्यावर या अभियानाची महाराष्ट्र प्रदेश संयोजक जबाबदारी युवा मोर्चाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी सोपीवली आहे, यावेळी प्रदेशमहामंत्री विक्रांत पाटील,प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर,महामंत्री सुशिल मेंगडे व अनुप मोरे यांनी शुभेच्छा दिल्या.
close