शौकतभाई शेख श्रीरामपूर:
राज्य शासनाच्यावतीने दीपावली करिता अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या हस्ते आनंदाचा शिधा वाटप करण्यात आले.
यावेळी लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता, हे समाधान पाहून तहसीलदार पाटील भारावून गेले, लाभार्थीपैकी एक श्री.भानुदास व इतर कार्डधारकांनी तहसीलदारांचा सत्कार केला,यावेळी तहसीलदार श्री.पाटील म्हणाले की लवकरात लवकर श्रीरामपूर तालुक्यात व शहरात अंतोदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना आनंद शिधा वाटपाचे नियोजन केले आहे तरी वरील लाभार्थ्यांनी या योजनेचा सर्व स्वस्त धान्य दुकानात आनंद शिधा उपलब्ध झाल्यावर या आनंद किटचा लाभ घ्यावा.
याप्रसंगी ऑल महाराष्ट्र फेअर प्राईस शॉप किपर फेडरेशनचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष माणिकराव जाधव, शिवाजी सैद, सोमनाथ देवकर,चंद्रकांत गायकवाड,नरेंद्र खरात, संतोष वेताळ, विजय मस्के, रवी काळे, सलीम शेख, धनंजय झिरंगे, योगेश गंगवाल,अमोल जाधव, राहुल पगारे, विनायक उबाळे, शामराव पवार, दिलीप त्रिभुवन, शांताराम बकरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विजयराव नगरकर, तसेच पढेगांव येथील सामाजिक कार्यकर्ते श्री.साळवे व इतर कार्डधारकांच्या उपस्थितीत या आनंद शिधा वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.