shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

“आडसूळ टेक्निकल कॅम्पसमध्ये एमबीए साठी शासनमान्य सुविधा केंद्र सुरू”


प्रतिनिधी : आसावरी वायकर

चास : ९ /    संस्थेचे अध्यक्ष माननीय अनिरुद्ध माणिक आडसूळ व प्राचार्य डॉ. प्रदीप एम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  आडसूळ टेक्निकल कॅम्पस मध्ये शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करीता प्रथम वर्ष एम बी ए प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.  महाविद्यालयामध्ये प्रशस्त कॉम्प्युटर सेंटर, इंटरनेट सुविधा , मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी तज्ञ शिक्षक वर्ग, प्रवेशासाठी आवश्यक लागणाऱ्या कागदपत्रांची माहिती या सर्व विषया बद्ल मार्गदर्शन केले जाते. 

राज्याच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष विभागाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार  पदवी  नंतर प्रथम वर्ष एमबीए प्रवेश घेण्यास ईच्छुक असणारे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशासाठी अर्ज नोंदणी करिता १३ ऑक्टोबर २०२२ पर्यंत मुदत असून  प्रथम वर्ष एमबीए करीता प्रवेश घेण्यासाठी कागदपत्रांची पडताळणी करणे आवश्यक असल्याची  माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप एम पाटील यांनी दिली.

तरी शहरी आणि ग्रामीण भागातील पालकांनी व विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी व कागद पत्रांची पडताळणी करून या सुविधा केंद्राचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप एम पाटील यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९८५०२८५५५८ उपप्राचार्य  प्रा. जाधव के . पी. यांच्याशी संपर्क साधावा .
close