🍃रविवारची कविता🫧
🍃🌼पावसाळी तुझ रूप..🪶
पावसाळी तुझ रूप
देह सावळ्या नभाचा
अदा झिंमाड सरींची
तोरा लख्ख ग विजेचा
🍃🫧
हाती घावत बी नाही
जस पाखरु बाजिंद
जाळ टाकून थकला
झाला शिकारी ग धुंद
धुंद शिकाऱ्याची धुंदी
नाही भरोसा जाळ्याचा
पावसाळी तुझ रूप
देह सावळ्या नभाचा
🍃🫧
जायबंदी झाला जीव
खुळ जाता ग जाईना
याद तुझी आल्यावीना
याचा दिवस ढळेना
कशी रात सरायाची
कसा दिस सरायाचा
पावसाळी तुझ रूप
देह सावळ्या नभाचा
🍃🫧
द्यावी समज किती ग
वैदवाणी बोलवावा
केले जंतर मंतर
तिढा कसा सोडवावा
तुझ्या नावाचं ताईत
जप रोज चालायचा
पावसाळी तुझ रूप
देह सावळ्या नभाचा
🍃🫧
© शंकर कदम,,✒
९८८१३६२४५७
दि,०९/१०/२०२२

