श्रीरामपूर । प्रतिनिधी :
श्री अडबंगनाथांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोभूमीत सद्गुरू नारायणगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने स्वामी अरूणनाथगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली येथे अडबंगनाथांचे भव्यदिव्य मनोहारी असे मंदिर उभारण्यात आले आहे.
भामानगर याठिकाणी श्री अडबंगनाथ संस्थानच्या वतीने वर्षभर पवित्र अन्नदानाचे महान कार्य स्वामी अरुणनाथगिरी महाराज यांचे मार्गदर्शनाखाली पार पडत आहे.. तसेच या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे प्रशिक्षणही दिले जाते. अनेक शिष्यगण आज प्रशिक्षण घेत आहेत.
कोजागिरी (अश्विन) पौर्णिमेच्या निमित्ताने येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
आज हभप श्री.अडबंगनाथ संस्थानच्या वतीने दुपारी चार ते सहा कीर्तन आहे. त्यानंतर महाप्रसाद,
सायंकाळी सात वाजता आरती होणार आहे. रात्री नऊ ते अकरा संगीत भजन, अकरा ते बारा कोजागिरी उत्सवाचा कार्यक्रम आणि रात्री बारा वाजता दूध अमृताचा महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थान घ्या वतीने करण्यात आले आहे.
॥जय अडबंगनाथ जी की आदेश ॥

