*🕉 सुप्रभातम्। 🕉*
*नमो नमः।।*
*आज बुधवार, दि. १२ ऑक्टोबर, २०२२ रोजीचे पंचांग आणि दिनविशेष*
*युगाब्द : ५१२४*
*भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक अश्विन २० शके १९४३*
*सूर्योदय : ०६:३२ सूर्यास्त : १८:१८*
*चंद्रोदय : २०:०५ चंद्रास्त : ०८:३५*
*शक सम्वत : १९४४*
*संवत्सर : शुभकृत्*
*दक्षिणायन*
*ऋतू : शरद्*
*चंद्र माह : आश्विज*
*पक्ष : कृष्ण पक्ष*
*तिथि : तृतीया - ०१:५९, ऑक्टोबर १३ पर्यंत*
*नक्षत्र : भरणी - १७:१० पर्यंत*
*योग : वज्र - १४:२१ पर्यंत*
*करण : वणिज - १३:३९ पर्यंत*
*द्वितीय करण : विष्टि - ०१:५९, ऑक्टोबर १३ पर्यंत*
*सूर्य राशि : कन्या*
*चंद्र राशि : मेष - २३:२९ पर्यंत*
*राहुकाल : १२:२५ ते १३:५३*
*गुलिक काल : १०:५७ ते १२:२५*
*यमगण्ड : ०८:०० ते ०९:२८*
*अभिजित मुहूर्त : कोई नहीं*
*दुर्मुहूर्त : १२:०१ ते १२:४८*
*अमृत काल : १२:११ ते १३:५१*
*वर्ज्य : ०५:५६, ऑक्टोबर १३ ते ०७:३८, ऑक्टोबर १३*
*तोच चंद्रमा नभात तीच चैत्रयामिनी*
*एकांती मजसमीप तीच तूहि कामिनी !*
*नीरवता ती तशीच धुंद तेच चांदणे*
*छायांनी रेखियले चित्र तेच देखणे*
*जाईचा कुंज तोच तीच गंधमोहिनी*
*सारे जरि ते तसेच धुंदि आज ती कुठे ?*
*मीहि तोच, तीच तूहि, प्रीति आज ती कुठे ?*
*ती न आर्तता उरात स्वप्न ते न लोचनी*
*त्या पहिल्या प्रीतीच्या आज लोपल्या खुणा*
*वाळल्या फुलांत व्यर्थ गंध शोधतो पुन्हा गीत ये न ते जुळून भंगल्या सुरांतुनी*
*-गीतलेखिका शांता शेळके*
*१९२२: कवयित्री आणि गीतलेखिका शांता शेळके यांचा जन्म. शांताताईंच्या जन्म शताब्दी सांगता (मृत्यू: ६ जून, २००२)*
*अंग्रेजी को खत्म कर दिया जाए। मैं चाहता हूं कि अंग्रेजी का सार्वजनिक प्रयोग बंद हो, लोकभाषा के बिना लोक राज्य असंभव है। कुछ भी हो अंग्रेजी हटनी ही चाहिये, उसकी जगह कौन सी भाषाएं आती हैं यह प्रश्न नहीं है। हिन्दी और किसी भाषा के साथ आपके मन में जो आए सो करें, लेकिन अंग्रेजी तो हटना ही चाहिये और वह भी जल्दी। अंग्रेज गये तो अंग्रेजी चली जानी चाहिये।- राम मनोहर लोहिया*
*समाजवादी पक्षाचे प्रभावी कार्यकर्ते म्हणून स्वातंथ्यचळवळीत ज्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला त्या राम मनोहर लोहिया यांचा आज स्मृतिदिन. देशात लोकशाही समाजवादी विचारसरणीचे लोण पसरविणारा हा स्वातंत्र्यपर्वातील आघाडीचा कार्यकर्ता. राम मनोहर लोहिया यांचे यांचे शिक्षण कोलकाता, मुंबई आणि बर्लिन येथे झाले. बर्लिनमधून पीएच.डी मिळवून ते भारतात परतले आणि सरकारी नोकरीचे आमिष लाथाडून स्वातंत्र्याच्या ध्येयप्राप्तीसाठी ‘चले जाव’ आंदोलनात उतरले.*
*१९४२ च्या ‘चलेजाव’ आंदोलनादरम्यान झालेल्या प्रतिकार सामर्थ्याचे जनक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. या आंदोलनादरमन्या आपल्या उपरोधिक शैलीत, विशिष्ट व्यक्ती व घटनांचे विश्लेषण करणारी भाषणे त्यांनी लिहिली. ती गुप्त रेडिओ केंद्रातून प्रसारित होत. १९५५ मध्ये त्यांनी समाजवादी पक्षाची स्थापना केली. १९६३ पासून ते संसद सदस्य होते. समाजवादी चळवळीचे नेतृत्व करणार्या लोहियांनी समस्यांच्या संदर्भात स्वदेशी समाजवाद विकसित करण्याची भूमिका मांडली. त्यांनी इंग्रजी आणि हिंदीतून लेखन केले.*
*१९६७: समाजवादी नेते, विख्यात संसदपटू, लोकसभेतील प्रभावी वक्ते व व्यासंगी लेखक डॉ. राम मनोहर लोहिया यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १९१०)*
*घटना :*
*१४९२ : ख्रिस्तोफर कोलंबस वेस्ट इंडिजमधील बहामाज येथे पोचला. आपण भारतात पोहोचलो आहोत असा त्याचा समज झाला.*
*१८२३ : स्कॉटलंडचे चार्ल्स मॅकिंटॉश यांनी पहिला रेनकोट विकला.*
*१८४७ : वर्नर वॉन सीमेन्स यांनी सीमेन्स व हलस्के (सीमेन्स एजी) कंपनी ची सुरवात केली.*
*१८५० : अमेरिकेतील पहिले महिला वैद्यकीय महाविद्यालय सुरू.*
*१८७१ : भारतात ब्रिटिश सरकारने क्रिमिनल ट्राइब्स अॅक्ट या कायद्याद्वारे १६१ जाती व जमातींना गुन्हेगारी जमाती ठरविले.*
*१९०१ : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रूजवेल्ट यांनी कार्यकारी हवेली ला अधिकृतपणे व्हाईट हाऊस हे नाव ठेवले.*
*१९६० : संयुक्त राष्ट्रांसमोर भाषण करताना सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांनी आपला मुद्दा ठसवण्यासाठी टेबलावर जोडा आपटला.*
*१९६८ : मेक्सिकोतील मेक्सिको सिटी येथे १९ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.*
*१९८३ : लॉकहीड कॉर्पोरेशनकडून वीस लाख अमेरिकन डॉलरची लाच घेतल्या बद्दल जपानचे पंतप्रधान तनाका काकुऐ यांना चार वर्षांचा कारावास.*
*१९८८ : जाफना विद्यापीठात एल.टी.टी.ई.च्या नेत्याला पकडण्यासाठी गेलेल्या भारतीय शांती सेनेच्या पथकावर गनिमी काव्याने हल्ला. भारतीय पथकाचे अतोनात नुकसान.*
*१९९८ : तेहतिसाव्या बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्ये कोल्हापूरच्या पल्लवी शाहने तिची लढत जिंकून इंटरनॅशनल वूमन मास्टर हा किताब मिळवला.*
*२००० : भारतीय वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ. सुरिंदर के. वसल आणि मेक्सिकोच्या वनस्पती जनुकशास्त्रज्ञ डॉ. इव्हॅन्जेलिना व्हिलेगास यांना प्रोटिनयुक्त मक्याची जात विकसित केल्याबद्दल सहस्त्रक जागतिक अन्न पुरस्कार जाहीर.*
*२००१ : संयुक्त राष्ट्रसंघ आणि राष्ट्रसंघाचे सरचिटणीस कोफी अन्नान यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर.*
*२००२ : दहशतवाद्यांनी इंडोनेशियातील बालीमधे दोन बारमध्ये घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात २०२ जण ठार तर ३०० जण जखमी झाले.*
*मृत्यू :*
*२०१२ : भारतीय न्यायाधीश व राजकारणी सुखदेव सिंग कांग यांचे निधन. (जन्म: १५ मे १९३१)*
*जन्म :*
*१९११ : क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक विजय मर्चंट यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १९८७)*
*१९१८ : उद्योगपती व क्रिकेट प्रशासक, बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया (BCCI) चे अध्यक्ष मुथ्थय्या अन्नामलाई तथा एम. ए. चिदंबरम यांचा जन्म. (मृत्यू: १९ जानेवारी २०००)*
*१९२१ : संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते जयंतराव श्रीधर टिळक यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल २००१)*
*१९३५ : भारतीय वकील आणि राजकारणी शिवराज पाटील यांचा जन्म.*
*१९४६: क्रिकेटपटू अशोक मांकड यांचा जन्म. (मृत्यू: १ ऑगस्ट २००८)*
*आपला दिवस मंगलमय जावो*
*जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम्*
*🙏माहितीस्तव: लोकसेवा विकास आघाडी, श्रीरामपुर*

