shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामपूर मधील कुख्यात मुल्ला कटर टोळीविरुद्ध मोक्का अहमदनगर पोलीस दलाची मोठी कारवाई..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 शुक्रवार दिनांक १४ ऑक्टोंबर २०२२

श्रीरामपूर मधील कुख्यात मुल्ला कटर टोळीविरुद्ध मोक्का अहमदनगर पोलीस दलाची मोठी कारवाई..!!

धर्मांतर ! बलात्कार ! निकाह प्रकरणी मुल्ला कटर कुरेशीसह ६ जणांना मोक्का !..!!

श्रीरामपूर  : आताची सर्वात महत्वाची बातमी म्हणजे श्रीरामपूर शहरात घडलेल्या अल्पवयीन विद्यार्थीनीचे अपहरण धर्मातर बेकायदा निकाह व सामुहिक बलाकार ! मुलीची विक्री ! वेशा व्यवसाय या अतिशय गंभीर अशा गुन्ह्यातील प्रमुख आरोपी इम्रान युसुफ कुरेशी उर्फ मुल्ला कटर याच्या सह ६ जणांवर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

       नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरिक्षक बी जे शेखर पाटील यांनी तसे आदेश बजावले आहेत . एसपी मनोज पाटील ,अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्तव्यदक्ष डीवायएसपी संदिप मिटके यांनी या प्रकरणी सखोल तपास करून संघटीत गुन्हेगारी मोक्का कायद्या अंतर्गत प्रस्ताव केला होता.त्याला आयजी बी.जे.शेखर पाटील यांनी मंजुरी दिली . 

     सामाजीक दृष्टया अतिशय गंभीर व संवेदनशील अशा धर्मातर अपहरण बेकायदा निकाह व सामुहिक बलात्कार अशा अतिशय गंभीर गुन्ह्याची दखल विधीमंडळात गृहमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली होती ! व सखोल चौकशी चे आदेश दिले होते . त्यावरून डीवायएसपी संदिप मिटके यांनी आता पर्यंत ६ आरोपींना अटक केली होती. धक्कादायक बाब म्हणजे धर्मातर बलात्कार निकाह व सामुहिक बलात्कार व वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलीची विक्री हे भयंकर वास्तव समोर आले.

      प्रमुख आरोपी इम्रान युसुफ कुरेशी ऊर्फ मुल्ला कटर,रा-वार्ड न २,श्रीरामपूर याच्यासह गुन्हे दाखल आहेत.आरोपीचे नाव-

1) इमरान युसुफ कुरेशी उर्फ मुल्ला कटर.

2) पप्पू उर्फ प्रशांत दादासाहेब गोरे        

3) सुमन मधुकर पगारे 4)सचिन मधुकर पगारे 5)बाबासाहेब एकनाथ चेंडवाल  

6)मिनाबाई रूपचंद मुसावत या सहा जणांवर मोक्का कायद्यार्तंगत कारवाई पोलीसांनी केली.

       या धड़क व गुन्हेगारांना जरब बसविणाऱ्या कारवाईचे जनतेतून स्वागत होत आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या सर्व आरोपींवर मिळुन तब्बल ५० गुन्हे दाखल आहे.पोलीसही गुन्ह्याची माहीती पाहून चक्राऊन गेले ! पोलीसांनी खोलवर तपास केल्याने या गुन्हेगारांची काळी कृत्ये जनते समोर आली.आता मोक्का लागल्याने आरोपींना जामीन मिळणे अवघड झाले आहे.


    भाजपाचे आमदार निलेश राणे यांनी श्रीरामपुरात या प्रकरणी मोर्चा काढला होता. या आरोपींना इतके दिवस कोण मदत करत होते याचा तपास सुरु आहे .लव जिहाद प्रकरणाने याची राज्यासह देशभर चर्चा झाली होती.

      सदरची कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.B.G. शेखर पाटील सो ,मा. श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक, अप्पर अधीक्षक मा.स्वाती भोर,यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके ,PI गवळी, API बोरसे, psi सुरवडे, Lpn अश्विनी पवार,PN संतोष दरेकर,Pc,रवींद्र माळी,विलास उकिरडे यांनी केली.


श्रीरामपूर मधील कुख्यात मुल्ला कटर टोळीविरुद्ध मोक्का अहमदनगर पोलीस दलाची मोठी कारवाई..!!

श्रीरामपूरच्या ‘लव्ह जिहाद’ टोळीवर मोक्कान्वये कारवाई! पोलीस उपअधीक्षक संदीप मिटकेंच्या प्रस्तावावर विशेष पोलीस महानिरीक्षकांचे शिक्कामोर्तब..

  : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गु.र.नं.666/2022 भादवि कलम 363 (अ), 368, 370 (4), 370(अ),पोक्सो,3,4,5,(G),6,17 पिटा ॲक्ट 4,5,6,7,अ.जा.ज.अ.प्र.का.क 3(1),(w)(i),(ii),3(2),(v),(3)(2)(5a) प्रमाणे दाखल गुन्ह्यात मुल्ला कटर टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 
टोळीचा टोळीप्रमुख इम्रान युसुफ कुरेशी उर्फ मुल्ला कटर वय 35 रा.वॉर्ड नंबर 2 श्रीरामपूर हा असून त्याचे श्रीरामपूर शहरात कायम वास्तव्य आहे तो आणि टोळीतील इतर सदस्यांनी वेळोवेळी एकत्र येऊन संघटितपणे मालमत्ता विषयक,शरीराविरुद्धचे,महिला अत्याचार संबंधी गुन्हे केल्याचे उघड झाले आहे मुल्ला कटर हा कोणत्याही प्रकारचा कामधंदा करीत नसून बळाचा वापर करून आर्थिक फायदा मिळविण्याकरिता तो वेळोवेळी त्याचे टोळीतील साथीदारांसह श्रीरामपूर शहर परिसरात अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असतो,त्यामुळे टोळीप्रमुख व टोळी सदस्या विषयी श्रीरामपूर शहर व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केलेले होते.श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 2 येथे राहणारी पिडीत हिच्यावर आरोपींनी सामूहिक बलात्कार करून तिला पांढरीपुल येथे टोळी सदस्य बाबा चेंडवाल यास विक्री केली टोळी सदस्य बाबा चेंडवाल याने तिचेवर बळजबरीने तिच्यावर अत्याचार केले व वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले तसेच टोळीप्रमुख मुल्ला कटर,बाबा चेंडवाल,पप्पू उर्फ प्रशांत दादासाहेब गोरे यांनी पीडितेची शेवगाव येथे कुंटणखाण्यात विक्री केली सदर गुन्ह्यात महिला आरोपी नामे सुमन मधुकर पगारे व सचिन मधुकर पगारे यांनी मदत केल्याचे तसेच वेश्याव्यवसाय करून मिळणाऱ्या पैशावर उदरनिर्वाह केल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्ह्याचे तपासी अधिकारी Dysp संदीप मिटके यांनी सदर गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम 1999 चे कलम 3 (1),(ii),3(2),3(4)प्रमाणे वाढीव कलम लावण्यास मंजुरी मिळणे बाबतचा प्रस्ताव अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर ,पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्या मार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परीक्षेत्र यांना सादर केला असता त्यांनी मंजुरी दिल्याने सदर गुन्ह्यास मोक्का कायद्यान्वये कलमवाढ करून कारवाई करण्यात आली.सदरची कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.B.G. शेखर पाटील, मा.श्री.मनोज पाटील पोलीस अधीक्षक,मा.स्वाती भोर,यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके,PI गवळी,API बोरसे,psi सुरवडे, Lpn अश्विनी पवार,PN संतोष दरेकर,Pc,रवींद्र माळी,विलास उकिरडे यांनी केली.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
 


close