shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज तालुक्यात पावसाचा कहर; मांजरा धरण काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा...!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी  :-

परतीचा पाऊस मागच्या काही दिवसांपासून  जोरदार कोसळत असून मागील दोन दिवसापासून तर केज तालुक्यात पावसाने कहर केला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवाय शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.






मागील दोन दिवसापासून केज तालुक्यात विविध ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे उरलेसरलेले पिके, सोयाबीन हातची गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यावर्षी पावसाचा मुक्काम वाढल्याने शेतकर्यांच्या नियोजनावर पाणी फेरले आहे.

माजरा धरण काठच्या नागरिकांनी सतर्क रहावे... पि.आय. शंकर वाघमोडे

मांजरा धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे धरणाचे दरवाजे केव्हांही उघडले जाऊ शकतात, यामुळे नागरीकांनी सतर्क राहून जिवीत व आर्थिक हानी टाळण्यासाठी सतर्क रहावे व प्रशासनाला सहकार्य करावे, काही समस्या असेल तर तात्काळ प्रशासनाला संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.


तालुक्यातील अनेक नद्या दुथडी भरून वाहील्या

तालुक्यात सर्वदुर जोरदार पाऊस पडत असल्याने नद्या दुथडी भरून वाहत आहेत. नद्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने प्रवासी, वाहन धारकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

शहरातील आठवडी बाजारत शेतकरी, नागरीकांची दाणादाण

दिवाळी जवळ आल्याने सकाळी च शेतकरी मोठ्या आशेने शहरातील आठवडी बाजारात फळभाज्या घेऊन आले होते, परंतु सकाळी लवकरच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आजच्या बाजारात शेतकरी सह नागरीकांची दाणादाण उडाली.

close