सुलतानपुर मंडळातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना हेक्टरी तात्काळ ५० हजारांची मदत व इतर मागण्यांसाठी रास्तारोको..!
लोणार (विजय गोलेछा )
अतिवृष्टीमुळे नुकसान ग्रस्त शेतकरी व घरांची पडझड झालेल्या ग्रामस्थां णा शासना मार्फत तात्काळ मदत द्यावी या व इतर मागण्या मंजुर करुण घेण्यासाठी आज सकाळी वंचित बहुजन आघाडीचे संघपाल पनाड यांच्या नेतृत्वात येथील राज्यमहामार्गावर रस्तारोको आंदोलन करण्यात आले.
दिनाक १० आक्टोबर ला सुलतानपुर मंडळात १०५ मिमि पाऊसाची नोंद होवुन झाल्याने मंडळातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत दयावी तर अतिवृष्टीने सुलतानपुर येथील ज्या ग्रामस्थांच्या घरांचे नुकसान झाले त्यांना सानुग्रह मदत दयावी , जे घरकुल लाभार्थी प्रतिक्षा यादित आहेत त्यांना अनुदान देण्यात यावे तसेच लोणार पंढरपुर पालखी मार्ग व वेणी बोरखेडी रस्त्यावरील जंक्शनचे काम निकृष्ठ झाल्याने श्रीहरी कंट्रक्शन व नळगे ठेकेदारांवर आणि सुलतानपुर ग्रामपंचायतच्या व महावितरणच्या काही कर्मचाऱ्यांनी कामचुकारपना केल्याने त्या कामाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी आदि मागण्या पूर्ण होण्यासाठी सदरचा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी राज्यमहामार्गाच्या दुतर्फा वाहनांनाच्या तिन्ही बाजुस लांबच लाब रांगा लागल्या होत्या व.
यावेळी आदोलकांच्या वतीने शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला . यावेळी नागवंशी संघपाल पनाड, अनित्य घेवंदे, शे.अख्तर , मन्नान पटेल , जड्डा शेठ लोणार, भानदास पवार,शेख अमीर ,ग्रामपंचायत सदस्य संतोष शिंदे, ग्रामपंचायत सदस्य झाकीर पठाण, मनोहर पनाड,विलास भाई लहाने, ,बबन पनाड,अशोक पनाड, गफ्फार शहा, मुरलीधर नालींदे , राजहंस जावळे, अनिल पवार, शेख.राजीक , संजय पवार, राजेश पाटील सह असंख्य कार्यकर्ते नागरिक व नुकसानग्रस्त शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी हेड कॉन्स्टेबल प्रभाकर सानप, नाईक कॉन्स्टेबल राजेश जाधव,उमेश घुगे, पोलीस कॉन्स्टेबल उज्वल शिंदे यांनी बंदोबस्त केला आहे.

