प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : १८ / सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेब यांची त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली .
यावेळी भाऊसाहेब शिंदे आणि गिरीश महाजन साहेब यांच्यात अनेक सामाजिक विषयावर चर्चा झाल्या भाऊसाहेब शिंदे ना नुकताच वर्ल्ड बुक लंडन ने सन्मानित केले होते शिंदे यांच्या सामाजिक कार्याची दखल संपूर्ण जगा ने घेतल्या नंतर आणि स्तरातून भाऊसाहेब शिंदे यांच्या वर अभिनंदन चा वर्षाव होत आहे राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी भाऊसाहेब शिंदे यांच्या सामाजिक कार्याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .
भाऊसाहेब शिंदे यांचा अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव या त्यांच्या मामा च्या गावी त्यांचा जन्म झाला. त्यांचे मुळ गाव हे नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे त्यांनी त्यांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले त्या नंतर त्यांचे काॅलेज चे शिक्षण अहमदनगर येथे पुर्ण झाले. शिक्षण पूर्ण झाल्या नंतर शिंदे यांना एका बँकेत शिपाई या पदावर घेण्यात आले त्या ठीकाण च काम पाहून त्यांना कॅशियर या पदावर प्रमोशन भेटले पण भाऊसाहेब शिंदे यांच मन मात्र तिथे रमल नाही. त्यांनी ही नोकरी सोडून थेट भेट त्यावेळी चे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार साहेब यांना दिल्ली येथील निवासस्थानी जाऊन भेटले साहेबांना सांगितले मी नोकरी सोडली व पवार साहेबांच्या पायाला स्पर्श करुन आशिर्वाद घेतला. त्या वेळी शरद पवार साहेबांनी त्यांना विचारले आता पुढे काय करणार त्या वेळी त्यांनी साहेबांना सांगितल मला तुमच्या सारख बनायचय त्या नंतर पवार साहेबांनी त्यांना एक कानमंत्र दिला त्या नंतर त्यांनी त्यांच्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. आणि ते काम करत करत लोकांची सेवा करण्याची संधी भाऊला मिळाली त्यातूनच अनेक सामाजिक कार्य केली त्यामुळे भाऊंच्या सामाजिक कार्याची दखल जागतिक पातळीवर घेऊन यापूर्वी WORLD BOOK OF RECORD EUROP, राज्यपाल आणि आता वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन” ने सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे अनेक स्तरातून अभिनंदन केले जात आहेत .