शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन) :
वसंतदादा मल्टीस्टेट संस्थेच्या अकोले शाखेत नुकतीच मा.संचालक मंडळाची मासिक अधिसभा मोठ्या उत्साहात पार पडली. ठेवीदार आणि कर्जदार सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय सर्वानुमते घेण्यात आले असून आमच्या दृष्टीने संस्थेचा "सभासद" हा सर्वोच्च केंद्रबिंदू असल्याने पुढील आर्थिक वर्षापासून सभासदांना डेव्हीडंट देण्याचा मा.संचालक मंडळाचा मानस असल्याची प्रतिक्रिया संस्थेचे चेअरमन मुकुंद सिनगर यांनी दिली.
सर्वप्रथम अर्ध वार्षिक वर्षातच शाखेच्या एकूण ठेवी 1 कोटी रुपये पार झालेबद्दल शाखेतील कुशल कर्मचारी आणि विशेषतः शाखा व्यवस्थापक श्री. शैलेश देशमुख यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. यावेळी शाखेतील सर्व स्थानिक संचालक उपस्थित होते. दीपावलीनिमित्त सर्व कर्मचारी व जेष्ठ सभासद संचालकांना मिठाईचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे संस्थेत अशा कुठल्याही अनाठायी खर्चाची तरतूद केली जात नसून आजवर गेल्या 7 वर्षापासून संचालक मंडळाच्या वतीने संस्थेचे चेअरमन मुकुंद सिनगर हे स्वखर्चातून कर्मचारी यांना दरवर्षी न चुकता दिवाळीला मिठाई वाटप करतात. यावेळी संस्थेच्या सर्व शाखांना 'श्री साई स्तवन मंजरी' चे वाटप करण्यात आले असून या दिवाळीला लक्ष्मीपूजन'च्या दिवशी प्रमुख सभासद,संचालकांच्या उपस्थितीत सर्व शाखांमध्ये सामूहिक स्तवन मंजरी पठण करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे सरव्यवस्थापक मा. गणेश वाळुंज यांनी दिली.
मा.संचालक मंडळाच्या वतीने खऱ्या अर्थाने शाखा वाढीसाठी सदैव मेहनत घेणाऱ्या कर्मचारी यांची दिवाळी गोड करत संस्थेच्या सर्व सभासदांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी संस्थेचे चेअरमन मा. मुकुंद सिनगर साहेब यांच्यासह संचालक सर्वश्री मा.शामदादा वाळुंज, मा.गणेश धुमाळ, मा.सतिश भांगरे, मा.सोपान देशमुख, मा.अतुल लोहाटे, मा.सुनिल गिते, मा.बाळासाहेब नवले, मा.बाबासाहेब आभाळे, मा.मिलिंद नाईकवाडी यांच्यासह शाखा व्यवस्थापक मा.शैलेश देशमुख व कुशल कर्मचारी वर्ग उपस्थित होते.