संजय माकणे- प्रतिनिधी
चाकुर :- चाकूर तालुक्यातील डोंगरज येथील एका शेतकऱ्याने उसामध्ये गांजाची झाडे लावली होती. सदरील घटनेची माहिती एका खबऱ्यानी उदगीर येथील पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे यांना दिली. माहिती मिळताच उदगीर येथील विशेष पोलीस पथकाने दिनांक 11 ऑक्टोबर रोजी घटनास्थळी जाऊन उसात लावलेली 44 झाडांचा पंचनामा केला. यात 109 किलो गांजा आढळून आला याची किंमत 10 लाख रुपये आहे. याबाबत शेतकरी दशरथ रामचंद्र कांबळे (वय 47 रा. डोंगरज ता. चाकूर) यास अटक करण्यात आली आहे.
याबाबत उदगीर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झाला असून सदरील कारवाई पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक सुमेध बनसोडे, तानाजी चेरले, पोलीस अमलदार रमेश कांबळे, राम बनसोडे, सखाराम भिसे, सिद्धेश्वर स्वामी, कृष्णा पवार, राहुल गायकवाड, गंगाधर साखरे, नामदेव चरले, तुळशीराम बरुरे, शिवदास बोईनवाड, गंगाधर साखरे, नजीर शेख यांच्या पथकाने केली आहे.

