shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दापोडी, पुणे येथील जनता शिक्षण संस्थेच्या, श्रीमती सी.के. गोयल कला आणि वाणिज्य महाविद्यालयात शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त "रास दांडिया"कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न..!

पुणे :-दापोडी, पुणे येथील जनता शिक्षण संस्थेच्या, श्रीमती सी.के. गोयल कला आणि वाणिज्य महाविद्यालयात शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त "रास दांडिया"कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न!-


 कार्यक्रमासाठी विद्यार्थिनींची उपस्थिती लक्षणीय!महिला प्राध्यापिका व विद्यार्थिनी एकत्रित दांडिया खेळून घेतला मनमुराद आनंद..
विद्यार्थिनींची आकर्षक  पेहराव आणि ड्रेपरी ठरली कार्यक्रमाचे आकर्षण! परिसरात सर्वत्र कार्यक्रमाचे होते कौतुक!
           शनिवार दिनांक १/१०/२०२२ रोजी सकाळी ९:३० ते १२:०० या वेळेत सी.के. गोयल महाविद्यालयात विद्यार्थिनींसाठी 'रास दांडिया' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
        कार्यक्रमाची सुरुवात  उद्घाटन :दुर्गा मातेच्या पूजनाने करण्यात आले.
     त्यानंतर सामूहिक देवीची आरती घेण्यात आली.
         कार्यक्रमाचे प्रास्ताविक: प्रा. प्रियांका पवार यांनी केले" त्यांनी आपले प्रास्ताविक करताना म्हणाल्या "नवरात्र हा महिलांच्या कर्तुत्वाचा सन्मान करणारा उत्सव आहे. देवी देवतांनी दृष्टां राक्षसांचा नाश करून प्रजेला मुक्त केले. नवरात्रीच्या काळातील विजयादशमी(दसरा) हा सण म्हणून मोठ्या थाटाने साजरा केला जातो. महाविद्यालयातील विद्यार्थिनींना दांडिया खेळाचे निमित्ताने त्यांच्यामधील कलागुण प्रकट करण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थिनींना देण्यात येत आहे. त्याचा लाभ विद्यार्थिनींनी आनंदाने घ्यावा."
            'रास दांडिया' कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थिनींची व प्राध्यापकांची "संगीत खुर्ची" हा खेळ घेण्यात आला. याचा निखळ आनंद विद्यार्थिनींनी व प्राध्यापकांनी घेतला.
       संगीत खुर्चीनंतर प्रत्यक्ष दांडियासाऊंड सिस्टिमच्या आवाजावर विविध देवी देवतांच्या गाण्यावर तालबद्ध पद्धतीने खेळण्यात आला. दांडिया साठी आवश्यक साहित्य( टिपऱ्या) घेऊन विद्यार्थिनी मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभागी झाल्या, अतिशय आकर्षक पद्धतीने दांडिया विद्यार्थिनी खेळत होत्या. सलग दीड तास विविध राऊड मध्ये दांडिया खेळ शिस्तबद्धपणे खेळला.
      दांडियाच्या कार्यक्रमानंतर दांडिया कार्यक्रमातआकर्षक आणि सुयोग्य ड्रेपरी असणाऱ्या विद्यार्थिनींमधून प्रथम क्रमांक,
 उत्कृष्टपणेदांडिया खेळणाऱ्या खेळाडूंमधून प्रथम क्रमांक,संगीत खुर्चीतील खेळामधून शेवटी फायनल एक विद्यार्थिनीचा प्रथम क्रमांक काढण्यात आला खालील विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाली.
१)संगीत खुर्ची प्रथम क्रमांक: ज्ञानसी बांबळे
२) उत्कृष्ट ड्रेपरी: नंदिनी मल्लाव
 ३)उत्कृष्ट दांडिया खेळाडू: खुशी रेड्डी
        पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांचा सन्मान स्टेजवर महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षकांच्या समवेत आकर्षक बक्षीस देऊन करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजन: राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख: प्रा. डॉ. बाळासाहेब माशेरे, विद्यार्थी विकास मंडळ प्रमुख: डॉ. स्वाती काळभोर, सांस्कृतिक विभाग प्रमुख,: डॉ.प्रियांका  बच्चाव, क्रीडा विभाग प्रमुख: डॉ. शोभा शिंदे यांनी केले. 
      कार्यक्रमाचे अध्यक्ष: प्राचार्य डॉ. सुभाष सूर्यवंशी हे होते. त्यांनीआपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले"राज दांडिया कार्यक्रमाचे आयोजन अतिशय उत्तमपणे करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी या निमित्ताने मिळाली. असून नवरात्राचे महत्व विद्यार्थ्यांना या कार्यक्रमातून समजले आहे."कार्यक्रमाचे सूत्रसंचालन: प्रा. डॉ. पौर्णिमा कोल्हे यांनी केले.आभार: प्रा.दिपाली खरडे यांनी मानले.

कार्यक्रमाची सांगता: डॉ. प्रियंका बच्चाव यांच्या सुमधुर आवाजातील 'वंदे मातरम'! गीताने झाली.कार्यक्रमासाठीत महाविद्यालयातील १२० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
       कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापकांमध्ये प्रा.डॉ.सोमनाथ दडस,सिद्धार्थ कांबळे, शिंदे महेंद्र, पठारे प्रितेश, बैसाने परबतराव, उत्तम गोरड, डॉ. माने नागनाथ, वैभव वरडुले, विनोद डिके, अमरदीप गुरमे, वैभव डावखर,बांबळे अनिता, ज्योती लेकुळे, नंदा काशीद, वंदना दळवी, लक्ष्मण कोहिनकर, लक्ष्मण मुरकुटे, हनुमंतराव गायकवाड, कपिल कांबळे इतर  उपस्थित होते.
close