shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बाळासाहेब तनपुरे लिखीत 'न्यायदेवता' पुस्तकाचे गडाखांच्या हस्ते प्रकाशन

शौकतभाई शेख श्रीरामपूर :-
तालुक्यातील भेर्डापूर येथील रहिवासी व मुळा कारखान्याचे सेवानिवृत्त जनसंपर्क अधिकारी बाळासाहेब तनपुरे लिखीत 'शनिदेवता' पुस्तकाचे प्रकाशन ज्येष्ठ नेते व साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या हस्ते करण्यात आले.

सर्व साहित्यिक व पत्रकारांची आज दिवाळीच्या पूर्वसंध्येला झालेली अपुर्व भेट म्हणजे साहित्यिक येती घरा.. तोची दिवाळी-दसरा.. अशी आपुलकीची भावना गडाख यांनी व्यक्त केली.


सोनई येथील गडाख वस्तीवर झालेल्या कार्यक्रमात साहित्यिक डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी प्रास्ताविक भाषणात पुस्तकात असलेली शनिदेवाची माहिती व शनिशिंगणापुर गावाचे महत्त्व तसेच जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या माध्यमातून झालेल्या विकासाची माहिती दिली. लेखक बाळासाहेब तनपुरे यांनी पुस्तकात शनिदेवाची संपुर्ण माहिती बरोबरच शनिदेवाचे गोत्र,आई,वडील, बहीणीचे नाव तसेच उत्सवाची माहीती असल्याचे सांगितले. 

यावेळी शनैश्वर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, माजी अध्यक्ष शिवाजीराव दरंदले,सेवा सोसायटीचे माजी अध्यक्ष विश्वासराव गडाख,पत्रकार विनायक दरंदले,भागवत मुठे, चंद्रकांत कवडे,वैभव काकडे, जावेद शेख उपस्थित होते. पत्रकार प्रकाश कुलथे यांनी आपला  वल्ड सामना दिवाळी अंक गडाख यांना भेट देवून आजच्या भेटीने आम्हा सर्व साहित्यिकांना मनोमन समाधान लाभल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री संगिता फासाटे यांनी केले तर आभार वल्ड सामना दिवाळी अंकाचे संपादक प्रकाश कुलथे  यांनी मानले.

     
close