हिंगणगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी गणेश शिंगाडे यांची बिनविरोध निवड.
इंदापूर प्रतिनिधी: नुकत्याच पार पडलेल्या हिंगणगाव ग्रामपंचायत मधील उपसरपंच पदासाठी गणेश भैरू शिंगाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध पार पडल्याचे ग्रामसेवक एम के मुलांनी यांनी जाहीर केले .
या वेळी सरपंच रमेश मच्छिंद्र देवकर, ग्रा.पा. सदस्य साधना कैलास देवकर, सुयोग हनुमंत देवकर, बेगम तानाजी जगताप, भाग्यश्री लहू देवकर, शशिकांत साहेबराव आरडे, संतोष भास्कर देवकर, अंजनाबाई नागनाथ चोरमले, माया नारायण आरडे, उपस्थीती होते.यावेळी गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ विजय देवकर, रवींद्र देवकर, ऋषिकेश देवकर, मारुती कोळेकर, शंकर चोरमले, दत्ता देवकर, किरण देवकर, बिभीषन देवकर, सिद्धेश्वर खराडे, सचिन पाटील सर, नितीन आरडे, अतुल देवकर, रामभाऊ आसबे, उद्योजक लक्ष्मण वाघमोडे, सदस्य गोकुळ कोकरे, सचिन इंगळे, बापूराजे गलांडे, समाधान देवकर, हनुमंत पाडूळे, सुधीर पाडूळे, आबा देवकर, अमोल आरडे, पांडुरंग गरड आदी उपस्थित होते.
यानंतर इंदापूर येथे गणेश शिंगाडे यांचा सन्मान महेंद्रदादा रेडके मित्रपरिवार यांच्या वतीने करण्यात आला.
तसेच तेजपृथ्वी ग्रूपच्या वतीने तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिताताई खरात यांनीही गणेश शिंगाडे यांचा सत्कार केला.
यावेळी अनिताताई खरात म्हणाल्या की, गणेश भाऊ शिंगाडे हे तेजपृथ्वी ग्रुपचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष असून त्यांचे सामाजिक काम अतिशय चांगले आहे. गणेश शिंगाडे यांना पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे सदस्य महेंद्र रडके ,कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती पांडुरंग मारकड, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब खरात यांचे मार्गदर्शन असते. तसेच ते तेजपृथ्वी ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक कामात नेहमी अग्रेसर असतात.सामाजिक कामाच्या जोरावर त्यांची बिनविरोध निवड झाली , तेजपृथ्वी ग्रुपचा पहिला उपसरपंच अशी त्यांची कायम ओळख राहील तसेच ग्रुपच्या वतीने त्यांना भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.