एक उदाहरण बघुयात.
एक खुप श्रीमंत माणुस पण त्याला सतत भिती असते की आपली संपत्ती चोरी होइल. त्याच्या घराजवळुन एक चोर जात असतो त्यालाही मोठी चोरी करायची असते.
त्या श्रीमंत माणसाने तयार केलेले विचार नकळत त्या चोरापर्यत पोहोचतात कारण त्याच्या भोवती तसं वलय तयार केलं गेलं. तो चोरी करुन निघुन जातो.
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी श्रीमंत माणूस कंगाल होतो आणि विचार करु लागतो हे असं कसं होतं ? त्यावर एका सर्वसामान्य माणसाचे विचार त्याच्या कानावर पडतात की तु काल तोच विचार केला होतास त्यामुळे चोरी झाली.
त्यावर तो श्रीमंत माणुस म्हणतो , तुझी बकवास बंद कर, काहीही फालतु बोलु नकोस, माझ्या छातीत दुखतय बहुतेक मला हार्टॲटॅक येणार. त्यावर तो सर्वसामान्य माणुस म्हणतो,
अरे भल्या माणसा असा विचार करु नकोस. मी मजेत आहे असं म्हण मी अजूनही श्रीमंत आहे म्हण आणि कष्ट कर संपत्ती पुन्हा तुझ्याकडे येइल.
पैशाने श्रीमंत असलेला माणुस मनाने आणि विचाराने खूपच अशक्त होता त्यामुळे त्याच्यावर ही परिस्थिती आली होती.. त्यामुळे आपले विचारच आपली ताकद आहे.
विचारांना योग्य दिशा द्यायची असेल तर मन मजबूत करा आणि जे हवय त्याचा ध्यास घ्या.
मला काही ही होत नाही यापेक्षा मी निरोगी आहे हे वाक्य जास्त प्रेरणादायी ठरतं कारण त्यात नाही हा शब्द नाही.
नकारात्मकता हीच आपल्या विकासाला बाधा आणते आणि सकारात्मकता आपल्याला यशस्वी बनवते.
त्यामुळे हिच सकारात्मकता घेउन उद्यापासून व्यायामाला सुरुवात करा कारण गेले चार दिवस भरपुर गोड खाऊन झालय त्याचं फॅट्स मधे रूपांतर होण्याआधी कॅलरीज बर्न करुयात.
व्यायाम करा. निरोगी रहा.
मन करा रे प्रसन्न ....
🍁🌈🛕⛱️🍁