छोट्यांनी उभारला किल्ला...दिवाळीत किल्ल्याला विशेष महत्व...
शेळगाव (तेलओढा) येथील ननवरे कुटुंबातील मुलांनी बनवला किल्ला.
इंदापूर प्रतिनिधी: दिवाळी या सणात किल्ल्याला खूप महत्व असते.किल्ला म्हणजे लहान मुलांना आनंदाची पर्वणी असते.किल्ला बांधताना स्वनिर्मिती,कष्टाचे महत्व,आपल्या राज्याचा इतिहास,संघटन कौशल्य,किल्ल्यावर असणाऱ्या गोष्टींची माहिती मिळते जसे तोफखाना, माची, तटबंदी, सैनिक,घरे,विहिरी,तालीम,प्राणी,शेत,संरक्षण साहित्य.
घरातील लहान मुले मोबाईल ,टीव्ही सोडून किल्ला बांधण्यात,त्या किल्ल्याची माहिती मिळवण्यात मग्न होतात.आपल्या तालुक्यातील छायातेज क्लासेस निमगाव के,आरोग्य प्रतिष्ठान इंदापूर अशी प्रतिष्ठान किल्ला स्पर्धा भरवतात ,बक्षिसे ,सहभाग प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहन देण्याचे काम करतात त्यामुळे मुले आनंदाने किल्ले बनवतात. शेळगाव (तेलओढा) येथील ननवरे वस्तीवरील किल्ला स्वतः सर्व साहित्य जुळवून ननवरे कुटुंबातील मुलांनी बनवला.तो किल्ला अतिशय छान बनवून त्या किल्ल्याची काळजी पण ते घेत आहेत.तो किल्ला तयार करण्याचे काम सोहम ननवरे,प्रथमेश ननवरे,शुभम ननवरे,शिवम ननवरे यांनी केले.