shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्‍ह्यात जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्‍यात येणार-जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
गुरुवार दिनांक १३ ऑक्टोंबर २०२२

जिल्‍ह्यात जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्‍यात येणार-जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर..!!


अहमदनगर : दि.१५ ऑक्टोबर रोजी जागतिक हात धुवा दिनाच्या निमित्ताने जिल्‍हयातील सर्व शाळा,अंगणवाडी व ग्रामपंचायतीमधून शनिवारी जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्‍यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली.स्‍वच्‍छ भारत मिशन (ग्रामीण) अभियानांतर्गत राबविण्‍यात येणा-या स्‍वच्‍छतेच्‍या विविध कार्यक्रमांपैकी वैयक्तिक स्‍वच्‍छतेसाठी हात धुणे हा एक महत्‍वाचा भाग आहे.जनतेच्‍या स्‍वच्‍छतेविषयी जाणीवा समृध्‍द होवून सदृढ, निरोगी व आनंददायी जिवनासाठी जागतिकस्‍तरावर शनिवार १५ ऑक्‍टोबर हा दिवस दरवर्षी हातधुवा दिन म्‍हणून साजरा केला जातो. 

त्‍याअनुषंगाने जिल्‍हयातील सर्व ग्राम पंचायतीमधून जागतिक हातधुवा दिन साजरा करण्‍यात येणार असल्‍याची माहिती अहमद नगर जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दिली आहे.हातधुवा दिनाच्‍या संकल्‍पनेला धरुन अन्‍न स्‍वच्‍छता, हातधुण्‍याच्‍या महत्‍वाच्‍या वेळा विशेषतः स्‍वयंपाक करण्‍यापूर्वी, स्‍वयंपाक झाल्‍यावर, शौचाहून आल्‍यावर, जेवणापूर्वी, बाळाला भरविण्‍यापूर्वी, लहान बाळाची शी धुतल्‍यानंतर, झाडझुड केल्‍यानंतर, पाळीव प्राणीमात्रांना स्‍पर्श केल्‍यानंतर, आजारी व्‍यक्‍तीच्‍या भेटी पूर्वी व नंतर, बाहेर खेळून, फिरुन आल्‍यानंतर साबणाने हात धुणे आवश्‍यक आहे. 

या संदर्भात ग्रामीण भागातील लोकशिक्षण घडवून आणण्‍यासाठी गावातील सर्व सार्वजनिक ठिकाणी हात धुण्‍याचे प्रात्‍यक्षिक करुन दाखविण्‍यात येणार आहे. यासाठी मोठया प्रमाणात जनजागृती शाळा अंगणवाडी सह ग्रामपंचायतीनी करावी तसेच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना हात स्वच्छ धुण्याचे महत्त्व सांगताना हात धुण्याचे चे प्रात्यक्षिक करून दाखवणे आवश्यक असून हात धुण्याचे फायदे तोटे सांगितल्यास वर्तन बदलास मदत होणार आहे.

यासाठी शालेय विद्यार्थ्यांसोबत हात धुण्याचे महत्त्व व त्यांचा आरोग्यास होणारा लाभ याबाबत चर्चा व संवाद साधण्यात यावा.शालेय स्तरावर या दिवसानिमित्त” हाताची स्वच्छता” या विषयावर निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, व पोस्टर तयार करणे आशा विविध प्रकारच्या स्पर्धा घेण्यात याव्या. गावात स्वच्छता फेरी मारून प्रत्येक घरातून एक साबण गोळा करून शाळेला देण्यात यावा असेही आवाहन प्रकल्प संचालक जलजीवन मिशन सुरेश शिंदे यांनी केले.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
 
close