shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मीनाताई कळकुंभे यांची ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉपकिपर फेडरेशनच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी बिनविरोध निवड...!

शौकतभाई शेख श्रीरामपूर  :
ऑल महाराष्ट्र फेअर प्राइस शॉप किपर फेडरेशनच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी मीनाताई कळकुंभे याची बिन विरोध निवड करण्यात आली.
फेडरेशनचे खजिनदार विजय गुप्ता,फेडरेशनचे विभागीय अध्यक्ष शहाजी लोखंडे यांच्या हस्ते त्यांना या निवडीचे पत्र देण्यात आले.

यावेळी नुतन अध्यक्षा मीनाताई कळकुंभे म्हणाल्या की,संघटनेचे सभासद वाढवून संघटना जिल्हा संघटन मजबूत करणार असून मी यापूर्वी या संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्षपद प्रभावीपणे सांभाळले आहे, लवकरच जिल्हा मेळावा घेण्यात येणार असून विविध समस्यांकरीता शासन दरबारी योग्य पाठपुरावा केला जाणार आहे असेही त्या म्हणाल्या.

यावेळी संघटनेचे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष माणिकराव जाधव,सोमनाथ देवकर, शिवाजी सैद,शांताराम बकरे, आकाश त्रिभुवन तसेच नेवासा, पाथर्डी, शेवगाव, राहाता, संगमनेर व इतर तालुक्याचे सर्व पदाधिकारी, सभासद उपस्थित होते,विजय म्हस्के, चंद्रकांत गायकवाड,अतुल झीरंगे,राहुल पगारे, विनायक उबाळे, शाम पवार, किरण काळे, किशोर भालदंड, सुरेश चोरडिया, बनीचंद खरात, योगेश गंगवाल, अरुण खंडागळे ,सातपुते ताई, शेवगाव व आदि संघटनेचे सभासद बंधू- भगीनींनी या निवडीचे स्वागत करुन मिनाताईंना शुभेच्छापर अभिनंदन केले आहे.
close