[मॉडर्न हायस्कूल, पुणे येथे ११-१०-२०२२ या आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त विशेष उपक्रम]
संयुक्त राष्ट्र संघाच्या सभेने ११ ऑक्टोबर हा दिवस आंतरराष्ट्रीय कन्या दिन म्हणून घोषित केला आणि मुलींच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी दरवर्षी ११ ऑक्टोबरला बालिका/कन्या दिन जगभर साजरा केला जातो. या दिवशी, मुलींचे हक्क, अधिकार, मुलींच्या विशेष समस्या, मुलींसाठीच्या विशेष संधी अशा विषयांवर जगभरात कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
या वर्षी आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे घोषवाक्य आहे, "आपला काळ— आपले हक्क, आपले भविष्य". कन्या दिनाचे औचित्य साधून, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे, जिल्हा व सत्र न्यायालय, पुणे (डालसा), कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे आणि सीएफएसआर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने “डिजिटल जगातील मुली: संधी व आव्हाने” या विषयावर 'डालसा' च्या सचिव सौ. मंगल कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली मॉडर्न हायस्कूल, पुणे येथे कायदेविषयक जागृती सत्राचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी ऍडव्होकेट नंदिनी शहासने, विश्वस्त, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांनी शालेय विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. डिजिटल इंडिया मूव्हमेंट, डिजिटलायझेशन, इंटरनेट तंत्रज्ञान तसेच इंटरनेट प्रसार माध्यमांचा वापर शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि सर्वांगीण विकासासाठी सुज्ञतेने कसा करता येईल याबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अगदी दुर्गम भागात राहणारे ज्यांना शहरात जाणे शक्य नाही, माहिती मिळविण्यासाठी फारश्या सोयी सुविधा नाहीत अशा लोकांसाठी इंटरनेट हे एक वरदान म्हणून काम करू शकते असेही त्या म्हणाल्या.
इंटरनेट/संगणक साक्षरतेचे फायदे आणि गरज समजावून सांगितल्यानंतर डिजिटल फूटप्रिंट्स, डेटा प्रायव्हसी, अनधिकृत डिजिटल कंटेंट शेअरिंग/डाऊनलोड करणे, कॉपीराइटचे उल्लंघन, डेटा चोरी, बँकिंग फ्रॉड, सोशल मीडिया वरील धमक्या, पाठलाग, नको असलेले मेसेज पाठविणे, मोबाइलचा गैरवापर, पासवर्ड एथिक्स आदी कायदेशीर बाबींची माहिती, शहासने यांनी विद्यार्थीनी व शाळेतील शिक्षकांना दिली.
डिजिटल युग हे जितके फायदेशीर तितके फसवे आणि घातक ठरू शकते. म्हणूनच महाविद्यालयीन जीवन सुरू होण्याच्या मार्गावर असलेल्या ९ वी आणि १० वीच्या मुलींसाठी हे जनजागृती सत्र घेण्यात आले. या सत्राच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या कायदेविषयक जागृतीमुळे त्यांच्या विचारांचे पोषण आणि भविष्यात त्यांना सदर विषयी सूज्ञतेने निर्णय घेण्यास मदत होईल.
हे सत्र आयोजित करण्याची सोय करणाऱ्या मॉडर्न हायस्कूल, पुणे येथील प्राचार्या श्रीमती माया नाईक यांच्यासह अंदाजे ११७ विद्यार्थी व १० शिक्षक. पुणे येथील सीएफएसआरचे श्री. आनंद बखडे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कामकाज व त्याअंतर्गत मुलींना मोफत शिक्षण व महिला सक्षमीकरणाच्या योजनांसाठी मदत करण्यासाठी विविध योजनांची माहिती दिली. शालेय प्राधिकरणाने आभार प्रदर्शन करून सत्राचा समारोप केला.
अंदाजे ११७ विद्यार्थीनी आणि १० शिक्षीकांना या सत्राचा लाभ घेता आला. मॉडर्न हायस्कूल, पुणेच्या प्राचार्या, श्रीमती माया नाईक यांनी सत्र आयोजनास सहकार्य केले.
पुणे येथील सीएफएसआरचे श्री. आनंद बखडे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कामकाज व त्याअंतर्गत मुलींना मोफत शिक्षण व महिला सक्षमीकरणाच्या विविध योजनांची माहिती दिली. शाळेकडून आभार प्रदर्शनाने सत्राचा समारोप झाला.

