shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

हर्षवर्धन पाटील यांचे बिरोबाला साकडे सर्वांचे चांगले व्हावे यासाठी केली प्रार्थना*

*हर्षवर्धन पाटील यांचे बिरोबाला साकडे सर्वांचे चांगले व्हावे यासाठी केली प्रार्थना*
  इंदापूर प्रतिनिधी:भरणेवाडी येथील श्री. बिरोबा यात्रेनिमित्त समस्त धनगर बहुजन समाजाचे दैवत श्री. बिरोबा देवाचे दर्शन राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी घेतले तसेच त्यांनी यावेळी बिरोबाला साकडे घालून सर्वांचे चांगले व्हावे यासाठीची प्रार्थना केली.
  बिरोबा देवाचे दर्शन घेऊन, कपाळी भंडारा लावून , बिरोबाच्या नावाचं चांगभलं म्हणत राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बिरोबा देवाला सर्वांचे चांगले होवो यासाठी साकडे घातले. भरणेवाडी येथील ग्रामस्थांनी यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना काठी आणि घोंगडे देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला.
    कोरोना कालावधीनंतरच्या या यात्रेमध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.
close