shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रखडलेल्या उमरी रस्त्यासाठी नगरपंचायतच्या डिसाळ कारभाराविरोधात 5 डिसेंबर पासून घंटानाद/थाळीनाद आंदोलन !!

                        

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रति निधी  :-      

केज शहरा अंतर्गत रस्त्याचे प्रत्यक्ष काम एक महिन्याच्या आत निविदा काढून  सुरू करण्यात येईल असे लेखी अश्वासन केज नगरपंच्यायतने देऊनही एक महिना संपत आला असताना अद्याप  निविदा प्रक्रिया अथवा  इतर अत्यावश्यक कार्यवाही सुरू केली नसल्याने आता मात्र 5 डिसेंबर पासून लोक सहभागाने केज नगरपंच्यायत समोर बेमुदत घंटानाद व थाळीनाद आंदोलन करण्याचा निर्णय केज विकास संघर्ष समितीने घेतला आहे.                    

उमरी रस्त्याच्या मजबुती व काँक्रेटिकरण करण्यासाठी केज विकास संघर्ष समिती गेली अनेक वर्षे विविध आंदोलनाच्या रूपाने पाठपुरावा करत आहे. आता या रस्ता कामासाठी केज नगरपंच्यायत कडे 98 लक्ष एवढा निधी मंजूरही झाला आहे. मात्र केवळ निविदा काढून हे काम करण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी विनाकारण केज नगरपंच्यायत विलंब करत असल्याचे दिसून येत आहे. 



ही बाब अत्यंत चुकीची व तितकीच गंभीर असल्याचे समितीचे मत आहे. अगोदरच केज शहर विकासापासून वंचित असताना नवीन सत्ताधारी बॉडीने मंजूर कामे तात्काळ पूर्ण करून  जनतेला दिलासा देणे गरजेचे असताना उमरी रस्त्यासारखा महत्वाचा प्रश्न कारण नसताना प्रलंबित ठेवणे चुकीचे आहे. लेखी आश्वासने देऊनही कामे न करणे गैर आहे. जर कामे करायची नसतील तर जनतेला खोटी आश्वासने देणे सत्ताधाऱ्यानी टाळावे असेही समितीने म्हटले आहे. जर उमरी रस्त्याचे काम निविदा काढून येत्या 4 डिसेंबर पूर्वी सुरू केले नाही तर येत्या 5 डिसेंबर पासून केज नगरपंच्यायत समोर नागरिकांच्या सहभागाने बेमुदत घंटानाद/थाळीनाद आंदोलन करणार असल्याचे समन्वयक हनुमंत भोसले, नासेर मुंडे, अजीम इनामदार, अतुल गवळी, बाळासाहेब देशमुख इत्यादींच्या वतीने देण्यात आला आहे.

close