shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिरसवडीचे डॉ.सचिन हजारे यांचे वैद्यकीय क्षेत्रातील अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षा २०२२ मध्ये सर्व विद्यार्थ्यांमध्ये ५३ वा तर ओबीसी मधून २१ क्रमांकाने उत्तीर्ण.

शिरसवडीचे डॉ.सचिन हजारे यांचे वैद्यकीय क्षेत्रातील अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षा २०२२ मध्ये सर्व विद्यार्थ्यांमध्ये ५३ वा तर ओबीसी मधून २१ क्रमांकाने उत्तीर्ण.                          
इंदापूर प्रतिनिधी: शिरसवडीचे गावचे भारतीय सेने मधून निवृत्त झालेले सिताराम भानुदास हजारे यांचे सुपुत्र डॉ.सचिन हजारे याने नुकतेच वैद्यकीय क्षेत्रातील अखिल भारतीय आयुष पदव्युत्तर प्रवेश परीक्षा २०२२ दिली होती त्याचा निकाल दिनांक ९ नोव्हेंबर २०२२ रोजी झाला. यामध्ये सचिन हजारे यांचा संपूर्ण भारतात ५३ वा तर ओबीसी मधून २१ क्रमांकाने यश संपादन करून ते पदव्युत्तर प्रवेश परीक्षा एम .डी./ एम. एस. (MD/MS) साठी त्यांची निवड झालेली आहे. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल  मित्र परिवार यांच्या वतीने डॉक्टर सचिन हजारे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सचिन हजारे यांचे प्राथमिक , माध्यमिक शिक्षण - प्रियदर्शिनी इंग्लिश मिडीयम स्कूल इंदापूर येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण - राजमाता अहिल्याबाई होळकर कनिष्ठ निवासी महाविद्यालय इंदापूर  विज्ञान शाखेतून  प्रथम क्रमांक ८४ .५५% ने उत्तीर्ण झाले आहेत. पुढे ते पदवी शिक्षण  र. आ. पोदार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय , वरळी मुंबई २०१६-२०२२साली मध्ये पूर्ण केले.सद्या ते ग्रामीण रुग्णालय निमगाव केतकी इंदापूर येथे इंटर्नशिप पूर्ण करत आहेत.
close