shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रा‍‌‌ज्यस्तर स्केटींग स्पर्धेसाठी कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलच्या खेळाडूंची निवड. . .


प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : १३ /  नुकत्याच प्रियदर्शनी पब्लि‌क स्कूल येथे अहमदनगर जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय स्पीड स्केटिंग, रोलर हॉकी व इनलाइन हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत भूषणनगर केडगाव येथील कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलच्या खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता.


 सदर स्पर्धेतून राज्यस्तर स्पर्धेसाठी अनेक खेळाडूंची निवड झाली आहे. सदर राज्यस्तर स्पर्धा व राष्ट्रीय निवड चाचणी व राष्ट्रीय स्पर्धापूर्व शिबिर पुणे येथे दिनांक १३ ते १९ नोव्हेंबर २०२२ दरम्यान होत आहेत. सदर राज्यस्तर स्पर्धेसाठी आपल्या दमदार खेळाच्या जोरावर खालील खेळाडूंची निवड झाली आहे.
मानव पटेल, पार्थ गायकवाड, अथर्व  माताडे,  अरहम भंडारी, 
 यशराज काळे, करन गुंजाळ, मोहम्मद सय्यद, आकाश  पानझडे, संदेश मकासरे, यश गायकवाड, सम्रुध्दी बिडकर, पार्थ आडोळकर, हर्ष कुलट, सकलेन खान, शौर्य ठोबंरे, अरशान पठाण, तन्मय टकले, मुरारी जोशी, समर्थ भिंगारदिवे, अर्जुन रासने, विराज बोरुडे, गुंडू स्वस्तिक, साहिल कोळगे, अर्नव लोंढे, स्वरूप लोंढे आदी खेळाडू निवडले गेले .

 सदर निवड झालेल्या खेळाडूंचे विद्यालयाच्या  व्यवस्थापिका सिस्टर पवित्रा, मुख्याध्यापिका सिस्टर डेल्ला, उप-मुख्याध्यापिका सिस्टर शेरोन यांनी अभिनंदन केले व पुढिल स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

सर्व विजेत्या खेळाडूंना शाळेचे क्रीडा शिक्षक ‍ राष्ट्रीय खेळाडू श्री. सतिश गायकवाड यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभले.
close