shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आधार सेवा परिवारामार्फत दिवाळी फराळ व भाऊबीजे निमित्त साडी वाटप

आधार सेवा परिवारामार्फत दिवाळी फराळ व भाऊबीजे  निमित्त साडी वाटप 
इंदापूर प्रतिनिधी: दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आधार सेवा परिवाराच्या वतीने दिवाळीच्या काळात   गोरगरीब , निराधार , गरजू लोकांना इंदापूर व आसपासच्या परिसरामध्ये दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आले. इंदापूर बस स्थानकामधील रात्री मुक्कामी असणाऱ्या तसेच फुटपाथवर रात्री राहणाऱ्या गोरगरीब,  गरजू ,निराधार लोकांना मोफत   दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आले. ऊस तोडणी मजूर व त्यांची लहान मुले यांनाही दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.  भाऊबीजे निमित्त ३४ गोरगरीब , गरजू महिलांना आधार सेवा परिवाराच्या वतीने  साडी व दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आले. निमगाव केतकी येथे ऊस तोडणी महिलांना जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व पंचायत समितीच्या माजी उपसभापती सौ. शालनताई गणपत भोंग यांच्या हस्ते साडी व दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आले.  इंदापूर व आसपासच्या परिसरामधील गरजू महिलांना आधार सेवा परिवाराचे अध्यक्ष  अरुण राऊत सर यांच्या हस्ते साडी व दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी आधार सेवा परिवारातील अनेक सदस्यांनी आर्थिक मदत केली.
close