shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथे अनिल पवार यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त उद्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

इंदापूर येथे अनिल  पवार यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे  आयोजन



इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर येथील  सामाजिक उपक्रमात  स्वत:ला वाहून घेतलेले   अनिल  पवार यांचा उद्या सोमवारी (दि.७) जन्मदिवसाचे आयोजन भव्य रक्तदान शिबिराबरोबरच विधवा व गरजू महिलांना साडी वाटप, तसेच इयत्ता दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वृक्षारोपण अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे  कार्यक्रमाचे आयोजक आपले मेंबर मित्र परिवाराच्या पदाधिकारी यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे उद्घाटन  माजी राज्यमंत्री व विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आहे तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष  माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आहेत, तसेच राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती प्रदीप गारटकर (रा. काँ. पुणे जिल्हाध्यक्ष) , दयानंद  इरकल ( पुणे शहर उपाध्यक्ष रा. काँ) , प्रवीण  माने( मा. सभापती जि. प. पुणे), अॅड. राहुल मखरे( राष्ट्रीय महासचिव बहुजन मुक्ती पार्टी) , राजवर्धन  पाटील (संचालक नीरा भीमा सह. सा. का.), अंकिताताई शहा नगराध्यक्ष इंदापूर न. पा), श्रीकांत पाटील (तहसीलदार इंदापूर तालुका), टि. वाय. मुजावर( पोलीस निरीक्षक इंदापूर) , रामराजे कापरे (मुख्याधिकारी इंदापूर नगरपरिषद), भरत शेठ शहा( व्हा.चेअरमन कर्मयोगी शं. पा. सह. सा. कारखाना), अशोक  इजगुडे (मा. नगराध्यक्ष इंदापूर न. पा) , मधुकर भरणे (संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर), प्रकाश पवार (सहाय्यक पोलीस निरीक्षक इंदापूर), रमेश पवार (दुय्यम निबंधक माळशिरस), महादेव सोमवंशी (शहर प्रमुख शिवसेना इंदापूर), साधू देवकर (उपसरपंच ), गणेश पाटील (युवा उद्योजक भिमानगर), कैलास गवळी (कार्याध्यक्ष त्रिदल माजी सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य), राम भैय्या गायकवाड(ए.आर. फाउंडेशन सं. अध्यक्ष म. राज्य), दत्ता गायकवाड (संचालक मकाई सह. सा. का. लि. जिंती), रविराज पवार (तालुकाध्यक्ष माजी सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य),

हे मान्यवर उपस्थित राहणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता भारुडाचा कार्यक्रम आयोजित केला असल्याचे सांगितले.

सदर कार्यक्रम वडार गल्ली, बाबा चौक (समाज मंदिर),इंदापूर या ठिकाणी आहे.

कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आमचे मेंबर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले
close