प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रति निधी :-
शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार मराठवाडा संपर्क नेते माननीय चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हा संपर्कप्रमुख मा. धोंडू दादा पाटील जिल्हा प्रमुख मा.आप्पासाहेब जाधव यांच्या उपस्थितीत केज तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 5/11/2022 रोजी केज शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसेना पदाधिकारी आढावा बैठक संपन्न झाली . यावेळी बैठकीला उपजिल्हाप्रमुख दिपक बप्पा मोराळे, रामदास भाई ढगे, विधानसभा प्रमुख अशोक जाधव युवा सेना तालुका प्रमुख अरविंद थोरात शहर प्रमुख तात्या रोडे महिला आघाडी तालुका प्रमुख अश्विनी दिदी बडे जिल्हा सहसघटक अभिमान बापू पटाईत जिल्हा सरचिटणीस महाराना घोळवे सर युवा सेना जिल्हा चिटणीस अनिल ठोंबरे सर बैठकीत उपस्थित होते .
सदरील बैठकीत संपर्क प्रमुख धोंडू दादा पाटील यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणूक संदर्भात आढावा घेऊन मार्गदर्शन केले तसेच शिवसेना सदस्य नोंदणी संदर्भात कडक सूचना देऊन पुढील चार दिवसात सर्व शिवसैनिकांनी केज तालुक्यातुन जास्तीत जास्त सदस्य नोंदणी फॉर्म भरून विक्रम करावा असे आवाहन केले.
जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी बैठकीत मार्गदर्शन करताना केज तालुक्यातील गावनिहाय शाखा स्थापन करून जिल्हा परिषद पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणूकीत भगवा फडकवण्या करिता पदाधिकार्यांनी पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना अभिप्रेत काम करा असे आवाहन केले .. तालुका प्रमुख रत्नाकर शिंदे युवा सेना तालुका प्रमुख अरविंद थोरात जिल्हा सरचिटणीस अनिल ठोंबरे सर शहर प्रमुख तात्या रोडे महिला आघाडी तालुका प्रमुख अश्विनी दिदी बडे यांनीही सर्व शिवसैनिकांना सोबत घेऊन तालुक्यात सदस्य नोंदणी करून माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या मागे केज तालुका भक्कम उभा करू असे आश्वासन दिले .
सदरील बैठकीत पत्रकार दिपकजी नाईकवाडे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला व नविन पदाधिका-याची निवड करताना केज तालुका संघटक ( पश्चिम विभाग )पदी लक्ष्मण गलांडे तालुका संघटक ( पश्चिम विभाग) पदी अविनाश करपे व तालुका सह संघटक पदी दिपक चंद्रकांत कदम यांची निवड करण्यात आली बैठकीला तालुका सचिव असरफ शेख तालुका समन्वयक सुधिर जाधव उप तालुका प्रमुख अभिजीत घाटुळ ज्ञानेश्वर बोबडे शिवाजी चौरे वाहतूक सेना शहर प्रमुख अमोल चौधरी कलसकर हरिष गिते अनिल खाडे दिलीप बप्पा जाधव रामभाऊ पवार उपशहरप्रमुख पपु ढगे अनिल मुळे युवा सेना समन्वयक राहुल फुके शशिकांत इंगळे श्रीकांत गायकवाड राजेभाऊ हंगे अनंत राउत रामभाऊ गवळी सह शिवसेना युवासेना महिला आघाडी वाहतूक सेना पदाधिकारी उपस्थित होते.

