shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथे अब्दुल सत्तार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीचे अध्यक्ष छायाताई पडसळकर यांनी केला निषेध व्यक्त.

इंदापूर येथे अब्दुल सत्तार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीचे अध्यक्ष छायाताई पडसळकर यांनी केला निषेध व्यक्त.
इंदापूर प्रतिनिधी:राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड मध्ये वृत्तवाहिनीला बोलताना सुप्रिया सुळे यांच्या बद्दल जे शब्द वापरले त्यावर आक्षेप घेत इंदापूर तालुक्यातील महिला आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा छायाताई पडसळकर यांनी राज्याची कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या वरती शिवराळ भाषा वापरली  याबद्दल अब्दुल सत्तार यांचा  जाहीर निषेध व्यक्त केला आहे . तसेच त्यांनी राज्य शासनाला बोलताना विनंती केली आहे की, या अब्दुल सत्तारांचा तात्काळ राजीनामा घ्यावा. अन्यथा आम्ही महिला या अब्दुल सत्तारांना रस्त्यावर फिरू देणार नाही. हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे. या महाराष्ट्रामध्ये आम्ही महिला भगिनी अपमान सहन करणार नाहीत. मला एक प्रश्न विचारायचे आहे की, हेच का तुमचं हिंदुत्व, हीच का तुमची संस्कृती. हेच का तुमचे महिला विषयी आदर.  राज्य शासनाला हा माझा प्रश्न असेल इंदापूर तालुक्यांमध्ये या अब्दुल सत्तारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करीत आहोत. तात्काळ राजीनामा नाही स्वीकारला तर इंदापूर तालुका च्या वतीने याचा तीव्र स्वरूपात आम्ही आंदोलन करू अशा शब्दात त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
close