shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथे जय हिंद आजी-माजी सैनिक संघटना व आमचे मेंबर मित्रपरिवार इंदापूर यांच्यावतीने शिरसोडीच्या डॉ. सचिन हजारे यांचा सत्कार करून केले अभिनंदन.

इंदापूर येथे जय हिंद आजी-माजी सैनिक संघटना व आमचे मेंबर मित्रपरिवार इंदापूर यांच्यावतीने शिरसोडीच्या डॉ. सचिन हजारे यांचा सत्कार करून केले अभिनंदन.  
                                
अखिल भारतीय आयुष पदवीत्तर प्रवेश परीक्षा २०२२ मध्ये भारतात ५३ वा तर ओबीसी मधून २१ व्या क्रमांकाचे उत्तीर्ण झाल्याबद्दल केला सत्कार.   
  इंदापूर प्रतिनिधी: शिरसोडी गावचे सुपुत्र डॉक्टर सचिन हजारे यांनी नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय आयुष पदवीधर प्रवेश परीक्षा २०२२ मध्ये भारतामध्ये ५३ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले तर ओबीसी मधून २१व्या क्रमांकाचे उत्तीर्ण झाले. त्याने मिळवलेल्या यशाबद्दल जय हिंद आजी-माजी सैनिक संघटना इंदापूर तालुका व आमचे मेंबर मित्रपरिवार इंदापूर यांच्यावतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. 
यावेळी आमची मेंबर मित्र परिवाराचे अनिल पवार, कुस्ती केंद्राचे अध्यक्ष मारुती मारकड, माजी सैनिक सुभाष थोरात ,तानाजी मोरे ,रविराज पवार तालुकाध्यक्ष ,गौतम मिसाळ ,शिवाजी भागवसे, युवराज चंदनशिवे ,सिताराम हजारे ,अशोक इंगळे   ,मच्छिंद्र पवार ,पिंटू घोडके  व इतर मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते.     यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉक्टर सचिन हजारे म्हणाले की या परीक्षेसाठी अतिशय कमी कालावधी मिळाला यामधूनही जवळजवळ २२ हजार विद्यार्थी भारतात या परीक्षेसाठी बसले होते त्यामधून भारतातून ५३ वा क्रमांक तर ओबीसी विद्यार्थ्यांमधून २१ वा क्रमांकांनी उत्तीर्ण झालो. माझ्या या यशामध्ये माझे आई-वडील ,माझे मामा प्राध्यापक चोरमले सर आणि आजोबा राघू चोरमले हे आजोबा माझ्यासाठी जरी शिकले नसले तरी शाब्दिक बळआणि मनोबळ देण्याचे काम त्यांनी केले. माझा या ठिकाणी सर्वांनी सत्कार करून अभिनंदन केले त्याबद्दल मी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.
close