मातंग समाजाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिले निवेदन
नेवासा : १५ / नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथील रवींद्र कणगरे त्यांच्या मुलाला दुकानामध्ये घेऊन खाऊ आणण्यासाठी गेले असता त्यांच्यावर व लहान मुलावर प्राण घातक हल्ला करून गावातील समाजकंटकाने धमकी व तलवारीचा धाक दाखवून गावातून पळून लावले आहे .
रविंद्र कणगरे यांनी नेवासा पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यासाठी संपर्क साधला असता सदर नेवासा पोलीस स्टेशन मध्ये कोणत्याही प्रकारची पोलीस कारवाई झाली नसल्याचे दिसून येत आहे . गोरगरिबाला पोलीस स्टेशन मधून न्याय मिळत नसल्याचे लहान मुलाचे वडील रविंद्र सांगत आहेत. सदर लहान मुलगा कृष्णा याचे सिव्हिल हॉस्पिटल मधे उपचार चालू आहेत . मागील चार दिवसापासून घरातील कुटुंब सिव्हिल हॉस्पिटलच्या बाहेर बसलेले दिसून येत आहेत . त्यांच्या जीविताला गावामध्ये धोका असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले . हल्ला करणारी व्यक्ती गावामध्ये मोकाट फिरताना दिसत आहे . सदर नेवासा पोलीस स्टेशन येथून जबाब घेण्यास कोणीही आलेले नसल्याचे निष्पन्न होत आहे. सदर व्यक्तीवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे जिल्हा सकल मातंग समाजाच्या वतीने माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
सदर व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी व कणगरे कुटुंबीयांना न्याय मिळावा ही समाजाच्या वतीने मागणी करण्यात आली आहे .

