प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
गटशिक्षणाधिकारी कार्यालय केज व क्रीडापरिषद केज यांच्या संयुक्त विद्यमाने आज केज तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेचे उदघाट्न मॉडेल इंग्लिश स्कुल केज या ठिकाणी युवानेते अक्षय भैय्या मुंदडा यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष केज गट साधन केंद्राचे गटशिक्षणाधिकारी मा. सुनिलजी केंद्रे सर, शाळेचे संस्थापक अध्यक्ष शिवराम घुले, शाळेच्या मु. जोशी मॅडम होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वासुदेव नेहरकर हे उपस्थित होते.
अक्षय भैय्या यांनी खेळाडूंना प्रोत्साहनपर मार्गदर्शन करून खेळाडूंचे मनोबल वाढवले. सर्व खेळाडूंना केज तालुका क्रीडा संयोजक विनोद गुंड यांनी मार्गदर्शन केले. या उदघाटन सोहळ्याचे सूत्रसंचलन एम. गिरी सर यांनी केले.
यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन आणि सर्व वैयक्तिक मैदानी खेळ यशस्वी पूर्ण करण्यासाठी केज तालुक्यातील क्रीडामार्गदशक/क्रीडाशिक्षक बर्डे सर, नेहरकर सर,कुलकर्णी सर(मॉ. इं. स्कु.)पठाण सर, पोटभरे सर, सोळुंके सर, वर्षा दीक्खत मॅडम, तोंडसे सर, चाळक सर, सारुक सर, टिके सर, शेप मॅडम, राऊत सर, पांचाळ सर यांनी मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी मोठ्या संख्येने खेळाडू व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

