shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज शहरात विजेचा लपंडाव सुरूच महावितरणच्या कारभाराला केजकर वैतागले!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
केज शहरात मागील महिनाभरापासून वीज कधी येते कधी जाते अशी परिस्थिती आहे . अनेक वेळा तर दोन तास आली तर दोन तास गेली अशी परिस्थिती आहे. ट्रांसफार्मर गेल्यामुळे दोन दिवसापासून तर विजेचा  लपंडाव  मोठ्या प्रमाणात  सुरू आहे . शहरातील विद्युत पुरवठा म्हणजे असून अडचण नसून खोळंबा आहे. 

सततच्या विद्युत पुरवठा खंडित होण्यामुळे केज  शहरातील उद्योजक आणि नागरिक वैतागले आहेत विद्युत पुरवठा नेमका सुरळीत कधी होणार हा प्रश्न आहे.
शहरात विद्युत पुरवठा करत असताना महावितरण कडून नेहमीच समस्या निर्माण होतात . सततच  विजपुरवठा खंड होत असल्याने नागरिकांनी तक्रारी करूनही काही उपयोग होत नाही.  वारंवार वीज गायब होते. विजेचे बिल भरण्यासाठी नागरिकांना तगादा लावला जातो, एखादा दिवस उशीर झाला तर वीज कनेक्शन खंडित केले जाते  .  मात्र महावितरण कडून  दिवस रात्र वीज दिली जात नाही . 

यामुळे केज शहरातील नागरिक संतप्त झाले असून महावितरणने  विद्युत पुरवठा सुरळीत करावा नसता महावितरणा विरोधात तिव्र अंदोलन छेडले जाईल अशी मागणी  केज शहरातील  नागरिकांमधून केली जात आहे.
close