गायरान जमिनीवर अतिक्रमण काढणे संदर्भातील न्यायालयाच्या आदेशाचा फेरविचार याचिका दाखल करा याबाबतचे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने इंदापूर तहसीलदार यांना दिले निवेदनपत्र.
इंदापूर प्रतिनिधी: सोमवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२२ रोजी इंदापूर तहसील कार्यालय येथे महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनीवरील २ लाख २३ हजार अतिक्रमण ३१ डिसेंबर २०२२ पूर्वी काढून टाकण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे या निर्णयामुळे राज्यातील गोरगरिबांना फार मोठा फटका बसणार आहे तरी या निर्णयाचा फेरविचार झाला पाहिजे. म्हणून गायरान जमिनीवर अतिक्रमण काढणे संदर्भातील न्यायालयाच्या आदेशाचा फेरविचार याचिका दाखल करण्यात याव्या या मागणीसाठी नायब तहसीलदार अनिल ठोंबरे यांना राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले. जर या मागणीचा विचार न केल्यास भविष्यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुकाध्यक्ष तानाजी मारकड यांनी दिला.
यावेळी तानाजी मारकड इंदापूर तालुका अध्यक्ष,सतीश शिंगाडे पुणे जिल्हा उपाध्यक्ष, गणेश हेगडकर सोशल मीडिया अध्यक्ष इंदापूर श्रीनिवास सातपुते इंदापूर शहराध्यक्ष, अण्णा पाटील, अविनाश मोहिते युवक नेते, नवनाथ कोळेकर, तात्याराम मारकड, सोन्या जानकर युवक.आ.उपाध्यक्ष, अतुल शिंगाडे असे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवेदन पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनीतील दोन लाख तेहतीस हजार अतिक्रमण ३१ डिसेंबर २०२२ पूर्वी काढून टाकण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे या निर्णयामुळे राज्यातील गोरगरिबांना फार मोठा फटका बसणार आहे. तरी या निर्णयाचा फेरविचार झाला पाहिजे. अशी राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ शासनाच्या वतीने फेरविचार याचिका दाखल करून सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष या प्रश्नासाठी महाराष्ट्रभर जनआंदोलन उभा करेल याची शासनाने नोंद घ्यावी . अशा आशयाची निवेदन पत्र देण्यात आले आहे.

