shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संजय राऊत यांना जामीन मंजूर.... शिर्डीत जल्लोष..!

कोण आला रे कोण आला..
शिवसेनेचा वाघ आला अश्या घोषणा देत शिर्डीत शिवसैनिकांनी जल्लोष साजरा 

शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन):
 
कथित पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी मागील १०० दिवसांपासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत तुरुंगात होते. त्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहे. पीएमएलए न्यायालयाने दिलासा देत संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे संजय राऊतांचा तुरुंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर, दुसरीकडे ईडीने त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांना जामीन मिळताच राहाता तालुक्यातील शिवसैनिकांनी फटाके वाजवून घोषणा देऊन जल्लोष साजरा केला.शिर्डी नगर परिषद समोर राहाता तालुक्याचे शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय अप्पा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शिर्डी शहर प्रमुख सचिन कोते, युवा सेनेचे दिनेश शिंदे, सुयोग सावकारे, अमोल गायके, दत्ता आसने, यांच्या सह मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी कोण आलारे कोण आला शिवसेनेचा वाघ आला अश्या घोषणा देत फटाके वाजवून जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.
close