shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देण्यासाठी ५ लाख पत्र

शिर्डी प्रतिनिधी ( संजय महाजन ) :-
आज संपूर्ण महाराष्ट्रातून धन्यवाद मोदीजी अभिनयाना अंतर्गत सुमारे ५ लाख पत्र भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवणार आहे.

          या अभियानाच्या वतीने आज भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, तथा उत्तर अ. नगर जिल्हा प्रभारी विक्रमसिंह बबनराव पाचपुते यांच्या सूचनेनुसार व महाराष्ट्र प्रदेश सदस्य किरण बोराडे व युवा मोर्चा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष श्रीराज डेरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष योगेश अण्णा गोंदकर यांच्या प्रमुख उपस्थिती शिरडी मंडल मध्ये धन्यवाद मोदिजी ह्या अभियान अंतर्गत नागरिकांची भेट घेऊन पत्र लिहून घेण्यात आली. केंद्र सरकारच्या विविध योजनेचे लाभार्थी कडून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नागरिकांच्या वतीने लिहिलेली पत्र पाठवण्यात आली.

         याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा शिरडीचे उपाध्यक्ष गणेश शेळके, सचिव अक्षय मुळे, सह सोशल मीडिया प्रमुख - विशाल पवार, साईराज रोहकले, श्याम गायके इतर कार्यकर्ते व नागरीक उपस्थित होते.
close