'बॅचलर ऑफ जर्नलिझम' परीक्षा उत्तीर्ण
प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : ११ / टिळक विद्यापीठाच्या 'बॅचलर
महाराष्ट्र ऑफ जर्नलिझम' या पदवी अभ्यासक्रमाचा नुकताच निकाल जाहिर झाला . यात नगर येथील गिरीश श्रीकांत रासकर हे उत्तीर्ण झाले आहेत.
गिरीश रासकर हे गेल्या ५ वर्षांपासून पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत असून बातमीदारासह त्यांनी अनेक मोठ्या वृत्तपत्रांत वितरण, जाहिरात, पेजीनेशन विभागाचे ही काम उत्कृष्ठपणे सांभाळले आहे. पत्रकारीता क्षेत्रात काम करीत असताना त्यांनी बीबीए, एमबीए (फायनान्स) मध्ये पदव्युत्तर पदवी संपादित केली आहे. रासकर हे सध्या दैनिक पराक्रमी या वृत्तपत्रात व्यवस्थापकिय संपादक या पदावर कार्यरत असून पत्रकारीता विषयात पीएचडी करण्याचा त्यांचा मानस आहे .
गिरीश रासकर यांना पदवी अभ्यासक्रमात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे रामदास नेहूलकर, बाळासाहेब धस, वामन सोलनकर यांच्यासह शहरातील अनेक वृत्तपत्रांचे संपादक, वरीष्ठ उपसंपादक, बातमीदार, वृत्तपत्र छायाचित्रकार, वितरण प्रतिनिधी तसेच जाहिरात, पेजीनेशन प्रतिनिधींचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत असून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे .

