shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माजी सभापती आणि सरपंच यांचा भाटुंबा ग्रामपंचायतमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराविरूद् एल्गारभाजप नेते नंदकिशोर मुंदडा यांनी घेतली उपोषण स्थळी जाऊन दोन वेळा भेट!!

प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रति निधी :-

 केज तालुक्यातील भाटुंबा येथील ग्राम पंचायतीच्या चुकीच्या पद्धतीने केलेली वॉर्ड रचना यासह विविध मागण्यांसाठी केज पंचायत समितीचे माजी सभापती आणि सरपंच यांच्यासह मानकरी आमरण  उपोषणाला बसले आहेत.

या बाबतची माहिती अशी की,केज पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर चवरे आणि भाटुंबा येथील सरपंच सुनील धपाटे यांच्या नेतृत्वाखाली भाटुंबा गावातील सुमारे ३० ते ३५ नागरिक आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अधिकाऱ्यांनी जाणुन बुजुन ग्रामपंचायतची चुकीचे वार्ड रचना केली आहे. मनरेगाच्या कामावरील मजुरांच्या कामाचे वेतन अदा झालेले नाही. ग्रामपंचायतचे संगणक चोरून नेलेले आहे. 




राष्ट्रीय पेय जल योजनेत केलेल्या भ्रष्टाचार. अंगणवाडी बांधकामाचे खोटे दस्तावेज देऊन पैसे उचलले. आर ओ फिल्टर न बसविता कागदोपत्री बसविलेले दाखवून पैसे उचलले आहेत. आर ओ फिल्टरसाठी रूम बांधकाम न करता पैसे उचलले आहेत. इंदिरा आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर असलेल्या व लाभार्थ्यांनी बांधकाम न करता जुने बांधकाम दाखवून पैसे उचलले आहे. ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार उघड़ करणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले गेले आहेत. या सर्व बाबींची सखोल  चौकशी करून दोशीवर  कारवाई करावी अशी आमरण उपोषणाला बसलेल्या  उपोषणार्थींची मागणी आहे.                                                          

यावेळी भाजपचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी उपोषण स्थळी दिवसात दोन वेळा भेट देऊन   आमरण उपोषणाला  आपला पाठिंबा जाहीर केला.  गावकऱ्यांच्या मागण्यांची तहसील प्रशासनाने योग्य दखल घेऊन दोशीवर  तत्काळ कारवाई करून भाटुंबाकरांणा न्याय देण्यात यावा अशी अग्राहाची मागणी भाजपचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांनी केली आहे.

close