shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भारतरत्न डॉ ए पि जे अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेच्या वतीने गरजूवंतांना कपडे व खाऊचे वाटप..!


शिर्डी प्रतिनिधी  (संजय महाजन):-
शिर्डी येथील भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सेवाभावी संस्था यांच्या वतीने गरजूवंतांना कपडे व खाऊचे वाटप संस्थेचे अध्यक्ष महेमूदभाई सय्यद यांनी दरवेळेस काही ना काही नवीन उपक्रम घेऊन येत असतात. या काही दिवसात दिवाळी निमित्त आंबेडकर नगर व  काही दूसरे भागातील दोनशे मुलांना नवीन कपडे व मिठाई चे वाटप करण्यात आले, 

त्याचप्रमाणे ऊस तोड करणार्या भागातील मुलांना नवीन कपडे व खाउ देण्यात आले. ही संस्था प्रत्येक दिवशी काही ना काही वेगळे योगदान करत असते. यामध्ये सर्वांचे संस्थेतील सर्व कार्यकारिणीचे योगदान असते. आणि आपण समाजाचे काही ना काही देणं लागतं. त्या दृष्टीने मेहमूद सय्यद यांच्या योगदानाने संस्थेच्या माध्यमातून ते सामाजिक काम चालू आहे.ते फार महत्त्वाचे आहे.

आज भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सेवाभावी संस्था,शिर्डी येथील कार्यक्रमात हाजी शमशुद्दीन, सरदार पठान,महेमुदभाई सैय्यद,जावेदभाई शाह, अशरफभाई सय्यद, दादा इनामदार मुख्तार सय्यद साजिद सय्यद,आसिफ इनामदार, रहीम पठान, अखलाख खान, फईम शाह, जलील पठान,जुबेर पठान,तौहीद पठान,नदीम असगरली,हैदर सय्यद,अज़ीम कुरेशी,शाहारुख शेख, सद्दाम शेख आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
close