shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर येथे धन्वंतरी हॉस्पिटल आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिकचे उद्घाटन संपन्न.

इंदापूर येथे  धन्वंतरी हॉस्पिटल आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिकचे उद्घाटन संपन्न.   
                                      
 इंदापूर मध्ये  १९ वर्षापासून डॉ. शैलेश काळेल बाबा चौक येथे देत होते रुग्णांना सेवा.                 

धन्वंतरी हॉस्पिटल आयुर्वेदिक पंचकर्म क्लिनिक इंदापूर येथे भारतीय स्टेट बँकेच्या पाठीमागे  नवीन वास्तूमध्ये स्थलांतरित.                    
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर येथील भारतीय स्टेट बँक शेजारी बुलेट शोरूमच्या पाठीमागे डॉक्टर शैलेश काळेल यांचे धन्वंतरी हॉस्पिटल आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक तसेच सलमान पठाण यांचे जन्नत मेडिकलचे  उद्घाटन समारंभ आज दिनांक १७ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी इंदापूर तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार मधुकर ठोंबरे, गट विकास अधिकारी विजयकुमार परीट, सहाय्यक गटविकास अधिकारी रामचंद्र शिंदे, उप अभियंता दीपक भोसले, युवराज पोळ, शकीलभाई सय्यद, कैलास कदम ,अब्राल पठाण ,शेरखान पठाण ,डॉ. महेश निंबाळकर, हमीद आतार ,महादेव चव्हाण इत्यादी मान्यवरांच्या शुभ  हस्ते उद्घाटन करण्यात आले.                          
इंदापूर येथील रहिवाशी असलेले  भोजलिंग काळेल, सौ. शोभा काळे यांचे सुपुत्र डॉक्टर शैलेश काळेल यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा इंदापूर येथे माध्यमिक शिक्षण नारायणदास रामदास हायस्कूल येथे  उच्च माध्यमिक वालचंदनगर शिक्षण येथे तर पदव्युत्तर शिक्षण एस. एस. एम. एम. महाविद्यालय पुणे येथे झाले त्यानंतर रुबी हॉल क्लिनिक मधून पी.जी. डी. एम. एस. पूर्ण केल्यानंतर गेली १९ वर्षापासून ते इंदापूर येथील बाबा चौक या ठिकाणी धन्वंतरी हॉस्पिटल आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक च्या माध्यमातून ते रुग्णांची सेवा करीत आहेत. तसेच त्यांचा विवाह वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर रेखा काळेल यांच्याशी २००६ मध्ये झाले. त्या आयुर्वेद तज्ञ आहेत. त्यांचीही गेली सतरा वर्षांपासून या हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांची सेवा चालू आहे. अशा अनुभव संपन्न असणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर शैलेश काळेल यांच्या या हॉस्पिटलचे अतिशय आनंदी उत्सवात उद्घाटन संपन्न झाले असून त्यांनी स्वकष्टातून नवीन वास्तू निर्माण करून त्यामध्ये आपले स्वतःचे हॉस्पिटल तयार करून त्याचे आज उद्घाटन केले. तसेच  उद्योजक राजाभाऊ इंगळे उद्योजक डॉक्टर मनोज काळे यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच अनेक मित्रपरिवार यांच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
close