मुंबई: वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतीदिनाच्या पूर्वसंध्येला दादर येथील स्मृतिस्थळावर उपस्थित राहून स्वर्गीय बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होऊन विनम्रतापूर्वक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिवादन केले.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जात चार महिन्यांपूर्वी राज्यात त्यांना अभिप्रेत असलेले शिवसेना-भाजप युती सरकार स्थापन केले. त्यानंतर राज्यातील गरीब, शेतकरी, कष्टकरी जनतेला न्याय देता येईल असे अनेक लोकोपयोगी निर्णय घेऊन जनतेच्या मनातील शिवशाही अस्तित्वात आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रसंगी म्हणाले.
याप्रसंगी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, बंदरे विकास मंत्री दादाजी भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, खासदार गजानन कीर्तिकर, खासदार राहुल शेवाळे, आमदार भरत गोगावले, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रताप सरनाईक, आमदार कालिदास कोळंबकर, माजी मंत्री रामदास कदम, माजी आमदार विजय शिवतारे, माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यासह बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

