shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विमुक्त जाती भटक्या जमाती मागासवर्गीय फ्रंटलर सेलच्या पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी अण्णासाहेब धोत्रे यांची निवड.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विमुक्त जाती भटक्या जमाती मागासवर्गीय फ्रंटलर  सेलच्या पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी अण्णासाहेब धोत्रे यांची निवड. 
  
 माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विमुक्त जाती भटक्या जमाती मागासवर्गीय फ्रंटलर  सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते  अण्णासाहेब धोत्रे यांना दिले नियुक्तीपत्र.                    
 इंदापूर प्रतिनिधी: विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विमुक्त जाती भटक्या जमाती मागासवर्गीय फ्रंटलर  सेलचे इंदापूर तालुका अध्यक्ष अण्णासाहेब धोत्रे यांची पुणे जिल्हा भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्या ग्रामीण अध्यक्षपदी आज दिनांक १४ नोव्हेंबर रोजी पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक पुणे येथील कार्यालयामध्ये माजी राज्यमंत्री तथा इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे, विमुक्त जाती भटक्या जमाती मागासवर्गीय फ्रंटलर  सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांच्या  हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.        यावेळी हनुमंत पाटील, दौंड तालुका अध्यक्ष संजय पवार, श्रीराम लकडे, शशिकांत पाटील, अण्णा सलमपुरे व इतर मान्यवर उपस्थित होते.                               इंदापूर तालुक्यातील कालठण नंबर १ या गावचे सुपुत्र  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धडाडीचे कार्यकर्ते व इंदापूर तालुका भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे अध्यक्ष अण्णासाहेब धोत्रे यांना आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली दिलेल्या जबाबदारीचे पक्षाच्या संघटन वाढीसाठी केलेल्या कामाचा विचार करून  विमुक्त जाती भटक्या जमाती मागासवर्गीय फ्रंटलर  सेलचे प्रदेशाध्यक्ष हिरालाल राठोड यांनी त्यांना पुणे जिल्हा भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्या ग्रामीण अध्यक्षपदी निवड करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांचे हात बळकट करण्यासाठी व पक्ष मजबुतीसाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या अधीन राहून आपल्याला काम करायचे असून आपण आजपर्यंत भटक्या विमुक्तामध्ये चांगले काम करीत आहात याची दखल घेऊन जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या शिफारशीवरून तुमची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पुणे जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी निवड करण्यात येत आहे. आपण पक्षाचा अधिक विस्तार करून अनेक पदाधिकारी पक्षाशी जोडावी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस  पक्षाचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच पक्ष वाढीसाठी पुणे जिल्हा भटक्या विमुक्त जाती जमाती सेलच्या ग्रामीण अध्यक्षपदी निवड करून काम करण्याची संधी देण्यात आले असल्याचे राठोड यांनी दिलेल्या नियुक्तीपत्रात  सांगितले आहे.
close