shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

एन. इ. एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर येथे बालदिन उत्साहात साजरा.

एन. इ. एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर येथे बालदिन उत्साहात साजरा.                                  इंदापूर प्रतिनिधी:एन. इ. एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज निमसाखर येथे बालदिन उत्साहात साजरा दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात आला .स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त एन. इ. एस .हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे बालदिन साजरा केला. त्यावेळी विद्यालयातील काही मुलांनी व मुलींनी चाचा नेहरू विषयी कविता सादर केल्या तर काही जणांनी आपले आदरयुक्त विचार त्यांच्या भाषणातून व्यक्त केले. विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक सोमनाथ चौधर ,अमोल रणवरे सर यांनी विद्यार्थ्यांना पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवनाविषयी माहिती सांगितली व त्यांच्या कार्याची करून दिली. या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थितीमध्ये पर्यवेक्षक मधुकर खरात सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमोद चव्हाण सर होते. या कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाने केले होते. मुख्याध्यापक चंद्रकांत गोपाळराव रणवरे यांनी सर्वांचे कौतुक करून अभिनंदन केले.तसेच या कार्यक्रमाची निवेदन आजिनाथ मालगुडे सर यांनी केले.
close