इंदापूर प्रतिनिधी: निमसाखर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारंडेवस्ती येथे बालदिन सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना पेन वह्या व खाऊचे वाटप निमसाखर ग्रामपंचायतचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते शेखर पानसरे यांच्या वतीने देण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उप मुख्याध्यापक मंगेश शेंडे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बालदिन विशेष माहिती विद्यार्थी यांना दिली. तसेच ते पुढे म्हणाले की,ग्रामपंचायत सदस्य शेखर पानसरे हे नेहमीच शाळेच्या विकासात्मक गोष्टीकडे लक्ष देतात व त्या तातडीने दूर करण्याचाही प्रयत्न अनेक वेळा त्यांनी केला आहे. मुलांसाठी पिण्याचे पाण्याची छोटीशी पाईपलाईन, वर्गामध्ये बल टाकणे व इतर गोष्टींकडे ते प्रामुख्याने लक्ष देतात.

