शिर्डी प्रतिनिधी: (संजय महाजन) :-
खान्देश मराठा मंडळाच्या वतीने खान्देशी मराठा समाज बांधवांचा वधू वर मेळावा नुकताच संपन्न झाला. यावेळी माजी कृषी संचालक श्री युवराज साळुंखे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मधुकर सोनू पगार, उपाध्यक्ष गुलाबराव सदाशिव पाटील, सयाजीराव रामराव पाटील, प्रदीप शिंदे, भास्कर पाटील, अनिल सावंत, जयवंत विनायक सिसोदे, मिलिंद , पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते. मंडळाचे सचिव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.
माजी अध्यक्ष बी.डी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी युवराज साळुंखे यांनी कार्यक्रमाला उद्देशून मार्गदर्शन केले. वधू वर यांचा परिचय पत्रक वाचन मिलिंद पाटील व जयवंत सिसोदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश भगवान पाटील यांनी केले.

