shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

भोजडे कुस्ती स्पर्धेत अत्यंत चूरशीच्या लढती- पै.श्याम मुर्तडक भोजडे केसरी' तर पै. ज्ञानेश्वर महाले भोजडे श्री' विजेते


शिर्डी प्रतिनिधी : ( संजय महाजन):-
 सामाजिक बातमी 

कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील ग्रामदैवत राजा विरभद्र यात्रौत्सवातील मुख्य आकर्षण आणि तीन दिवशीय यात्रेतील आजच्या शेवटच्या दिवशी झालेल्या एकूण कुस्ती स्पर्धा अत्यंत चूरशीच्या झाल्या. यात्रा कमिटीच्या वतीने पंचक्रोशीतील अनेक पैलवानांनी रोख बक्षिसे पटकावली. यावेळी शेवटच्या साखळी कुस्ती स्पर्धेतील विजेते पै.श्याम मुर्तडक यांना "भोजडे केसरी" तर पै. ज्ञानेश्वर महाले यांना "भोजडे श्री" पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

भोजडे ग्रामपंचायत, यात्रा कमिटी आणि समस्त भोजडे ग्रामस्थांच्या वतीने आज अखेरच्या दिवशी भव्य कुस्ती स्पर्धा भरविल्या होत्या. यात पंचक्रोशीतील अनेक मल्लानी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. यावेळी भोजडे गावात पहिल्यांदाच कोपरगाव येथील एक मुलगी पैलवान आणि उत्तर प्रदेश मधील एक तरुण पैलवान कुस्ती आखाड्यात उतरले आणि कुस्ती पटकावत विजेते ठरले. यावेळी पंचक्रोशीतुन पै. भगवान लोणारी, पै.सुरेश जाधव, पै. शक्ती त्रिभुवन, पै. अर्जुन आरणे, पै. जुबेर शेख, पै. अमोल खपके यांच्यात अतिशय चूरशीच्या लढती झाल्या. यावेळी अनेक लहान मुलांनी कुस्तीचा मनमुराद आनंद घेतला.

सर्वप्रथम भोजडे गावातील समस्त ग्रामस्थांच्या वतीने श्री हनुमान मंदिर व श्री विरभद्र मंदिरात श्रीफळ वाढवून वाजतगाजत कुस्तीच्या आखाड्यात सुरुवात करण्यात आली. यावेळी भोजडे नं.2 सोसायटीचे संस्थापक चेअरमन कै. सिताराम व्यंकटराव पा. सिनगर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कुस्ती स्पर्धा सुरु करण्यात आल्या. गेल्या 10 वर्षापासून त्यांच्या स्मरणार्थ सोसायटीचे विद्यमान चेअरमन मा. मुकुंद शहाराम पा.सिनगर यांच्या वतीने साखळी कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या जात असून उस्फुर्त प्रतिसादामुळे भोजडे गावचा नावलौकिक संपूर्ण पंचक्रोशीत वाढला आहे. यापुढे अशाच भव्य कुस्ती स्पर्धा भरविण्याबरोबरच गावातील जीर्ण झालेली तालीम स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने पुन्हा सुरु करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
सदर कार्यक्रमाच्या नियोजनासाठी भोजडे गावचे सरपंच मा.दत्तू दादा सिनगर, उपसरपंच मा.अजित सिनगर, मा.सुधाकर वादे, मा.ज्ञानेश्वर सिनगर, मा.भाऊसाहेब सिनगर, मा.अनंत सिनगर, मा.साहेबराव सिनगर, मा.रंगनाथ सिनगर, मा. गंगाधर वाबळे, मा.खंडू सिनगर, मा.शहाराम सिनगर, कैलास धट, वाल्मिक बोर्डे, संजय सिनगर, दादाभाऊ नाईकवाडे, प्रकाश गायकवाड, कैलास सिनगर, दादासाहेब बोर्डे, धोंडीराम धट, विक्रम सिनगर, अनिल मंचरे, विकास बोर्डे, गणेश वाळुंज, बाबासाहेब मंचरे, विजय अभंग, सचिन मंचरे आदी ग्रामस्थांसह यात्रा कमिटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य व भोजडे पंचक्रोशीतील कुस्ती प्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
close