shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डीतील पदाधिकारी भारत जोडो यात्रेसाठी रवाना


शिर्डी । प्रतिनिधी : 
देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. तर दुसरीकडे देशातील सत्ताधारी मंडळी महागाई भष्टाचार, धार्मिक तेढ, जातीयवाद यासारखी आग विझवण्यासाठी कॉंग्रेसचे नेते खा. राहुल गांधी रस्त्यावर उतरून तोडो भारत जोडो" असा नारा देत या लोकांना आवाहन करत आहेत. महाराष्ट्रातून जाणाऱ्या १४ दिवसांच्या यात्रेत सहभागी होऊन भारत जोडो यात्रेचे आम्ही साक्षीदार होणार असल्याचे शिर्डी शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले यांनी सांगितले.

खा. गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर अशा भारत जोडो यात्रेचे सोमवारी महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे आगमन झाले. महाराष्ट्रातून काश्मीरकडे जाणाऱ्या १४ दिवसांच्या कालावधीत शिर्डीतील कॉंग्रेसचे पदाधिकारी साईबाबांचे दर्शन घेऊन यात्रेत सहभागी होण्यासाठी रवाना झाले. कॉग्रेसच्यावतीने वंदे मातरम, भारत माता की जय, नफरत तोडो भारत जोडो, च्या घोषणा देत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले म्हणाले की, कन्याकुमारीपासून सुरू झालेली यात्रा काश्मीरपर्यंत जाणार आहे. खा. राहुल गांधी यांच्या स्वतः नेतृत्वाखाली ही यात्रा सुरू झाली आहे. काल महाराष्ट्रात या यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत झाले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आ. अशोक चव्हाण, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा महाराष्ट्रातून जाणार आहे. या निमित्ताने भारत जोडो नफरत तोडो असा नारा राहुल गांधी यांनी दिला आहे. देशातील सत्ताधारी मंडळी सत्ता, खुर्ची टिकवण्यासाठी समाजात धार्मिक तेढ, जातीयवाद निर्माण करत खोटी आश्वासने देऊन सरकारे स्थापन करत आहे. देशातील शेतकरी हवालदिल झाला आहे. भ्रष्टाचार, महागाई आदी मुद्दे झाकण्यासाठी मिडीयावर दबावतंत्राचा वापर करून भरकटवले जात आहे. त्यामुळे सरकारचे छुपे धोरण लोकांना सांगण्यासाठी स्वतः राहुल गांधी रस्त्यावर उतरले असल्याचे त्यांनी म्हटले. यावेळी सुरेश आरणे, अॅड अविनाश शेजवळ, समीर शेख, ज्ञानेश्वर हातंगळे, मंगेश खाकाळे, दीपक चौगुले, अनिल निरगुडे, साई गोरे, राजू बर्डे, संतोष वाघमारे शिर्डीतील कॉग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
close