shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

'पोक्सो' न्यायालयाचा दणका : जामीनावरील आरोपीस ताब्यात घेतले , अँड मनिषा पी केळगंद्रे..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. गुरूवार दिनांक २४ ऑक्टोंबर २०२२

'पोक्सो' न्यायालयाचा दणका : जामीनावरील आरोपीस ताब्यात घेतले , अँड मनिषा पी केळगंद्रे..!!

अहमदनगर : कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल गुन्हयातील आरोपी नामे माऊली उर्फ ज्ञानदेव बापू धायगुडे रा . राक्षसवाडी ता . कर्जत जि . अहमदनगर यांस विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती माधुरी एच . मोरे मॅडम कोर्ट यांनी पूर्वीच्या न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली . सदर प्रकरणी विशेष सरकारी वकील अॅड . मनिषा पी . केळगंद्रे - शिंदे यांनी सरकार पक्षातर्फे विशेष भूमिका बजावली.

 घटनेची थोडक्यात हकीगत अशी की , कोतवाली पोलीस स्टेशन येथील भा.द.वि. कलम ३७६ अंतर्गत दाखल गुन्हयातील पिडीत हीने सरकारी वकील यांचे मार्फत मा . न्यायालया यांचेकडे लेखी स्वरूपात अर्ज देवून सांगिते की , सदर गुन्हयातील आरोपी नं. १. माऊली उर्फ ज्ञानदेव बापू धायगुडे रा . राक्षसवाडी ता . कर्जत , जि . अहमदनगर हा पिडीतच्या घराजवळ रहायला आहे . आरोपी हा सातत्याने सदर गुन्हयातून जामीन मंजूर झाल्यापासून पिडीतेच्या मोबाईलवर त्याच्या मोबाईलवरून वाईट अश्लील भाषेत मेसेज करीत आहे. तसेच आरोपी हा पिडीतेस पहाटेच्या सुमारास भेटायला बोलवित होता. तसेच आरोपी पिडीतेस तिची समाजामध्ये बदनामी करीन अशी धमकी देत होता.
 आरोपीच्या अशा वागण्यामुळे पिडीतेच्या वैवाहिक जीवनावर वाईट परिणाम होत होता . आरोपी जामीनावर सुटल्यापासून सतत पिडीतेस त्रास देत होता.
 याबाबत पिडीत हिने मा.न्यायालयात लेखी अर्जासोबत व्हाटस्अप मेसेजची रिकन शॉटच्या कॉपीज जोडलेल्या आले होत्या. पिडीतेचा सरकारी वकीलांच्यामार्फत अर्ज दाखल झाल्यानंतर आरोपीचे वकीलांनी त्यावर म्हणणे मागविण्यात आले. त्यावेळी आरोपीचे वकीलांनी पिडीतेचा अर्ज खोटा तसेच सदरच्या केसची सुनावणी लांबविण्यासाठी अर्ज दिला असल्याचे म्हणणे लेखी स्वरूपात दाखल करून पिडीतेचा अर्ज नामंजूर करण्याची विनंती केली. 

       सदरच्या प्रकरणी सरकारी वकील यांनी युक्तीवाद केला की , पिडीत हिने अर्जासोबत दाखल केलेले मेसेजेस जर वाचून पाहिले तर आरोपीने पिडीतेस अतिशय गलिच्छ , अर्वाच्च व अशिल भाषेत मेसेजेस केलेले दिसत आहेत . त्याबरोबर आरोपी हा रात्री मध्यरात्री पिडीतेस व्हिडीओ कॉल करीत असल्याचे दिसत आहे. मेसेजवरून आरोपी पिडीतेस धमक्या देत असल्याचेही दिसत आहे. त्याचबरोबर काही मेसेजेस जर पाहिले तर आरोपी याने त्याचे स्वतःचे वकीलांविरुध्दही अतिशय घाणेरडया भाषेत पिडीतेस मेसेजेस केल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता , पूर्वीच्या न्यायालयाने आरोपीस जामीन देतेवेळी काही अटी घालून दिलेल्या होत्या त्या अटींचे पालन आरोपीने केले नसल्याचे मा. न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले.


    तसेच आरोपीस त्याचे विरूद्ध मा. न्यायालयात गंभीर गुन्हा दाखल असलेबाबतची केस चालू आहे याबाबतचे देखील भान नाही व अशा आरोपीस जर जामीनावर तसेच खुले ठेवले तर आरोपीचे मनोधैर्य वाढेल व तो पिडीतेस त्रास देत राहिल. त्यामुळे पिडीतेचे जीवन जगणे मुश्किल होईल याचा परिणाम तिच्या वैवाहिक जीवनावर होईल असा युक्तीवाद विशेष सरकारी वकील अॅड. मनिषा पी. केळगंद्रे यांनी केला.

         सरकारी वकीलांचा युक्तीवाद व घटनेचे गांभीर्य पाहून मा. न्यायालयाने आरोपी माऊली उर्फ ज्ञानदेव बापु धायगुडे यांस पूर्वीच्या न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करून ताब्यात घेतले व आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. तसेच आरोपीचा वापरता मोबाईल जप्त करून योग्य ती कारवाई करण्याचे लेखी आदेश पोलीस निरीक्षक , कोतवाली पोलिस स्टेशन यांना दिलेले आहेत.
 अहमदनगर ता . २३/११/२०२२ 
 ( ॲड . मनिषा पी . केळगंद्रे- शिंदे )
 विशेष सरकारी वकील , अहमदनगर .
 मो . ९ ८५०८६०४११,
८२०८ ९९ ६७ ९ ५.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close