shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धारूर व वडवणीच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवण्यासाठी रमेश आडसकरांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट!!

प्रकाश मुंडे  | बीड जिल्हा प्रतिनिधी :-
धारूर_वडवणी तालुक्यात खरीप_हंगामात झालेल्या नुकसानीसाठी शासनाने मोठ्या संख्येने शेतकरी वगळले आहेत त्यासाठी मालगाव मतदार संघाचे नेते रमेश आडसकर यांनी पालकमंत्री यांची भेट घेऊन निवेदन देऊन दोन्ही तालुक्यातील सर्व शेतकऱ्याला शंभर टक्के अनुदान द्यावे याकरिता मागणी लावून धरली .

धारूर- वडवणी तालुक्यामध्ये खरीप हंगाम_2022 मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडून अतिवृष्टी झाली त्यामुळे आलेले पीक वाया गेले. 


यामध्ये शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकरी हवालदिल झाला काही शेतकऱ्यांनी आत्महत्याही केल्या शेतकऱ्याला शासनाकडून मोठ्या मदतीची अपेक्षा असताना धारूर व वडवणी तालुक्यातील 2305 शेतकरी अनुदानासाठी पात्र ठरविले आहेत यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत शेतकऱ्यांचे नुकसान मोठे होऊन  शेतकरी मोठ्या संख्येने अपात्र ठरवून फक्त 2305 शेतकरी पात्र ठरवले आहेत त्यामुळे बाकीचे शेतकरी प्रशासनावर रोष व्यक्त करत आहेत. त्यामुळे राहिलेल्या सर्वच शेतकऱ्यांना  100% अनुदान देऊन दिलासा द्यावा यासाठी माजलगाव मतदार संघाचे नेते रमेश  आडसकर यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांना शेतकऱ्याचे अनुदान तात्काळ वर्ग करून शंभर टक्के अनुदान द्यावे यासाठी निवेदन देऊन मागणी केली आहे.
close