शिर्डी प्रतिनिधी (संजय महाजन):-
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.नामदार श्री एकनाथराव जी शिंदेसाहेब व सौ शिंदे मॅडम यांनी शिर्डीच्या शिवसेनेच्या प्रथम मा. नगराध्यक्षा सौ अनिताताई जगताप पा व मा.उपनगराध्यक्ष श्री विजयराव जगताप पा. यांच्या विनंतीस मान देऊन शिर्डी भेटीचे आमंत्रण स्वीकारून श्री साईबाबांच्या दर्शनासाठी आले.
त्यानिमित्ताने त्यांचे स्वागत व सत्कार जगताप परिवार तर्फे करण्यात आला. याप्रसंगी राहाता तालुक्याचे भाग्यविधाते महसूलमंत्री मा ना.श्री राधाकृष्णजी विखे पा. शालेय शिक्षणमंत्री मा ना श्री दिपकजी केसरकर ,मा आमदार श्री संजयजी शिरसाठ ,माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे पा. तसेच बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व छत्रपती मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

